पाच लाखांच्या लाच प्रकरणातील दोन संशयित न्यायालयात सरेंडर, मुख्य आरोपी अद्यापही फरार - JUDGE BRIBERY CASE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी खासगी व्यक्तींमार्फत पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंद आहे. त्यातील दोघांनी सोमवारी (16 डिसेंबर) न्यायालयात शरणागती पत्करली. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी खासगी व्यक्तींमार्फत लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर ॲन्टी करप्शन विभागानं गुन्हा दाखल केलाय. त्यातील आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात हे न्यायालयात शरण आले. मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसंच लवकरच दोन्ही संशयितांना तपासासाठी ॲन्टी करप्शनच्या ताब्यात दिलं जाईल. तर या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावर उच्च न्यायालयात अद्याप अपील दाखल झालेलं नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.