जरांगे पाटलांचं नव्या सरकारला आवाहन; 'सामूहिक आमरण उपोषणा'च्या तारखेची उद्या करणार घोषणा - MANOJ JARANGE PROTEST
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 16, 2024, 9:10 PM IST
जालना : मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. त्यांनी सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मंगळवारी (17 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत. "मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. त्यामुळं या अधिवेशनात सरकारनं मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलय त्यावरही प्रतिक्रिया दिली. "छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी आम्हाला देणं घेणं नाही," असं मनोज जरांगे म्हणालेत.