दुबई BAN vs IND 2nd Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ मधील दुसरा सामना आज 20 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्ध अलिकडेच झालेल्या तीन सामन्यांच्या घरच्या वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ या सामन्यात प्रवेश करेल.
India are locked in and ready for the #ChampionsTrophy 👊 pic.twitter.com/db4Mfd6CUm
— ICC (@ICC) February 18, 2025
दोन्ही संघात दिग्गज खेळाडू : भारतीय क्रिकेट संघाची कमान रोहित शर्माकडे असेल. भारतीय संघात शुभमन गिल, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा समावेश असलेला मजबूत फलंदाजीचा संघ आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासारखे अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध मोठ्या विजयावर टीम इंडियाचं लक्ष असेल. दुसरीकडे, नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ भारताविरुद्ध मोठा अपसेट करण्याच्या उद्देशानं खेळेल. मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम आणि तस्किन अहमद सारखे अनुभवी खेळाडू असलेला बांगलादेश संघ भारताला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.
Ricky Ponting thinks India seamer Arshdeep Singh can fill the void of pace spearhead Jasprit Bumrah at the #ChampionsTrophy 💪
— ICC (@ICC) February 18, 2025
More 👉 https://t.co/fj9RDg5cU4 pic.twitter.com/prV4xzYHtp
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारत आणि बांगलादेश संघ वनडे सामन्यांमध्ये 41 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात भारताचा वरचष्मा असल्याचं दिसतं. भारतानं 41 पैकी 32 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशनं 8 सामने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णीत राहिला. यावरुन भारतीय संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे.
These pics from today 📸
— BCCI (@BCCI) February 17, 2025
How good 🤌🏻#TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/yM50ArMIj5
दुबईची खेळपट्टी कशी असेल : भारत विरुद्ध बांगलादेश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यादरम्यान दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला, नवीन खेळपट्ट्यांचा वापर केला जाणार असल्यानं परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल. मात्र सामना पुढं सरकत असताना फलंदाज धावा काढू शकतात. पण फिरकीपटूंना खेळपट्टीवरुनही मदत मिळू शकते.
Bangladesh Team reached Dubai for #ChampionsTrophy2025 🫶 🇧🇩#BCB #Cricket #Bangladesh #BDCricket pic.twitter.com/R4SLIUJOR8
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 14, 2025
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना 20 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी दुबई येथील दुबई स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.
The captains. The challenge. The pursuit for glory!
— ICC (@ICC) February 18, 2025
It’s All on the Line at #ChampionsTrophy 2025 🏆 pic.twitter.com/NreHUPrcyL
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना कुठं आणि कसा पहावा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झीद हसन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मोहम्मद महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.
हेही वाचा :