ETV Bharat / politics

विरोधकांचा विधानसभेत सभात्याग, वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी - MAHARASHTRA ASSEMBLY NEWS

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या विधिमंडळाचे लाईव्ह अपडेट

Maharashtra assembly winter session 2024
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 1 hours ago

नागपूर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. बहुमतात असलेल्या महायुतीकडून नाराज झालेल्या आमदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परभणीत झालेल्या हिंसाचारासह अनेक महत्त्वाचे मुद्दे आज चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Live Updates

  • वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड सापडले तर सर्व स्पष्ट होईल. आमदाराला एक बॉडीगार्ड तर आरोपी असताना त्याला २ बॉडीगार्ड कसे, असा प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिकला अटक करा. नाहीतर बीडमध्ये मोठा मोर्चा काढला जाणार आहे, आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. परभणी, बीडच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला.
  • काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी विधानसभेत परभणी आणि बीडमधील घटनेवरून स्थगन प्रस्ताव मांडला आहे. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला. पोलिसांनी चार तासानंतर कोम्बिंग ऑपरेशन केले. चर्चेला उशीर होईल, तेवढी राज्यात प्रतिक्रिया वाढत जाईल, अशी भूमिका मांडत पटोले यांनी चर्चा करण्याची मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी उद्या चर्चा करू, असे सांगितले. "सरकारलादेखील चर्चा करायची आहे. उद्या १०१ अन्वये प्रस्तावावर चर्चा केली जाईल," असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
  • महायुती सरकारच्या काळात ३५ राजकीय हत्या झाल्या आहेत, असे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " परभणी आणि बीडमधील अत्याचार झाला. ईव्हीएम मशिनमधून निवडून आलेल्या सरकारला जनतेच्या भावना कळत नाही".
  • "भुजबळांचा राग ओढावू नये, म्हणून अजित पवार अधिवेशनाला आले नसावेत," असा टोला शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. ते विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
  • शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना खातेवाटपावरून कोणताही तिढा नसल्याचं सांगितलं. "खातेवाटपाबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे. महायुतीमध्ये सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे". लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार असल्याची त्यांनी माहितीही दिली आहे.

सोमवारी अधिवेशनात काय घडलं?

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांच्या तरतुदीसह 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारनं विधिमंडळाच्या अधिवेशनात सोमवारी मांडल्या आहेत.
  • मागील अर्थसंकल्पात, राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. मासिक हप्ता 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये होणार असल्यानं राज्य सरकारला आर्थिक निधीची तरतूद वाढवावी लागत आहेत.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती.
  • सरकारनं सहकारी साखर कारखान्यांसाठी 1,204 कोटी आणि 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी 3,050 कोटी रुपयांची तरतूद यासाठीदेखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.

हेही वाचा-

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.