शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोलीस बँड पथकाकडून महाराजांना मानवंदना, पाहा व्हिडिओ - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JAYANTI
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-02-2025/640-480-23571309-thumbnail-16x9-maharaj.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 18, 2025, 10:13 PM IST
पुणे : बुधवारी जगभरात (19 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) केली जाणार आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास डेक्कन मराठा सोसायटी अभियान प्रतिष्ठान पुणे आणि शिव मोहोत्सव समिती, पुणे पोलीस दलाच्या बँड पथकाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ही मानवंदना देण्यात आली. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक AISSMS प्रांगण छत्रपती शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा', 'वीर मराठे वेडात दौडले', हे गीत सादर करत ही मानवंदना देण्यात आली. पोलीस बँड पथकाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवंदना देण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजक अण्णा थोरात यांनी दिली. बँड पथकाच्या वादनानं परिसर दुमदुमून गेला होता.