आमदार संग्राम जगताप यांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, ही "बारामती ऍग्रो..." - SANGRAM JAGTAP ON ROHIT PAWAR
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 18, 2025, 6:55 PM IST
(शिर्डी) अहिल्यानगर : आमदार रोहित पवार यांनी कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर करत नवा डाव टाकला. यावर अहिल्यानगरमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेले आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, "67 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरात झाली. उत्कृष्ट नियोजन आणि सर्वाधिक मल्लांची नोंदणी स्पर्धेत झाली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे स्पर्धेला उपस्थित असल्यानं काहीजण वल्गना करत आहेत. रोहित पवारांनी कुस्ती बघितली नाही, त्यामुळं ते स्पर्धा राजकीय झाल्याचं बोलत आहेत. कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा अधिकार आयोजकांना आहे. ही बारामती ऍग्रो फर्म किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही लोकप्रतिनिधी असून जिल्ह्यातील जनतेत असलेल्या व्यक्तींना बोलवलं होतं." रामदास तडस यांनी सांगितलं की, ही स्पर्धा अधिकृत नाही त्यामुळं त्यावर भाष्य नको.