दुबई IND Beat BAN in 2nd Match : भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा 6 विकेट्सनं पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलनं महत्त्वाची भूमिका बजावली. गिलनं शानदार खेळी केली आणि सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. गिलनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील आठवं शतक झळकावलं. त्यानं 125 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं. यापूर्वी, गिलनं इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं.
A fighting century from Shubman Gill helps India begin their #ChampionsTrophy campaign with a win 👏#BANvIND 📝: https://t.co/YrDJCV7R6G pic.twitter.com/xzVJ0niQ0J
— ICC (@ICC) February 20, 2025
शमीची घातक गोलंदाजी : तत्पूर्वी, सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचे 5 फलंदाज अवघ्या 35 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. नंतर, जाकर अली आणि तौहीद हृदयॉय यांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची विक्रमी भागीदारी करुन बांगलादेशला 228 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. जाकेर अलीनं 68 धावांची खेळी खेळली. तर, तौहीद हृदयॉयनं 100 धावा केल्या. मोहम्मद शमीनं 5 फलंदाजांचे बळी घेतले आणि वनडे सामन्यात सर्वात कमी चेंडूत 200 बळी पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला.
For his magnificent unbeaten 1️⃣0️⃣1️⃣, Shubman Gill is the Player of the Match 👏🏆#TeamIndia win #BANvIND and register 2 points 👌
— BCCI (@BCCI) February 20, 2025
Scorecard ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/ID5C8S2z1U
शतक झळकावल्यानंतर गिल नाबाद : बांगलादेशच्या 228 धावांच्या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली. 10 षटकांत 1 विकेट गमावल्यानंतर टीम इंडियानं स्कोअरबोर्डवर 69 धावा केल्या. यानंतर, विराट कोहली क्रीजवर आला आणि फक्त 22 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर, श्रेयस अय्यर (15) आणि अक्षर पटेल (8) फारसे काही करु शकले नाहीत आणि स्वस्तात बाद झाले. यादरम्यान, गिल दुसऱ्या टोकाला खंबीर राहिला आणि नंतर केएल राहुलसोबत 87 धावांची अभेद्य भागीदारी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएल राहुलनं 41 धावांची नाबाद खेळी केली. केएलनं त्याच्या डावात 1 चौकार आणि 2 षटकार मारले. 129 चेंडूत 101 धावा करुन गिल नाबाद परतला.
Leading the chase ✅
— BCCI (@BCCI) February 20, 2025
Hundred ✅
Win ✅
Vice Captain Shubman Gill guides #TeamIndia to victory 👏
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/YbWSCERX6E
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
बांगलादेश : तन्जीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, झाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
Shubman Gill kicks off his #ChampionsTrophy campaign with a bang 💥#BANvIND ✍️: https://t.co/zafQJUBu9o pic.twitter.com/iw0weSBilG
— ICC (@ICC) February 20, 2025
हेही वाचा :