विधानभवनात चिमुकल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हनुमान चालीसा पठण - DEVENDRA FADNAVIS HANUMAN CHALISA
🎬 Watch Now: Feature Video
Published : 4 hours ago
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. नागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आजपासून (16 डिसेंबर) राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आज एक छोटा चिमुकला विधिमंडळात आला होता. या मुलाचं नाव वेद असून मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या चिमुकल्याची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये एक स्पर्धाचं रंगली होती. वेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला साथ दिली. मात्र, ज्यावेळी वेद हा चुकू लागला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याला सांभाळून घेत हनुमान चालीसाचं पठण पूर्ण केलं.