VIDEO : चक्क नीलगाय बसली शेतकऱ्याच्या दारात - yawatmal video story
🎬 Watch Now: Feature Video
झरी तालुक्यातील बैलमपूर येथील जंगलातील एक निलगायी शनिवारी आपला रस्ता भटकून ते चक्क गावात शिरली. तिला शेतातल्या ताराच्या कंपाऊंडमधून उडी मारताना तिच्या शरीराला जखम झाल्यामुळे ती जखमी झाली होती. दरम्यान, यामुळे एका शेतकऱ्याच्या घराच्या दारासमोर ही निलगाय येऊन बसली. ती निलगाय सकाळपासून दुपारपर्यंत येथेच बसून होती. याची माहिती झरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी दिली. त्यानंतर वन कर्मचारी गावात पोहोचले त्यांनी जखमी नीलगायीवर औषधोउपचार करून तिला जंगलात सोडून देण्यात आले.