जालना : गावठी पिस्तुलासह दोघांना अटक - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video

जालना - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हान येथे ही कारवाई करण्यात आली. अमोल मदन आणि संजय शिंदे अशी आरोपींची नावे आहे. या आरोपींकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केळीगव्हाण येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याजवळ गावठी पिस्तुल आढळून आले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.