VIDEO: नागपुरात आरामशीन कारखान्याला भीषण आग - wood cutting factory fire lakadganj
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14951413-thumbnail-3x2-op.jpg)
नागपूर - नागपूरच्या लकडगंज भागात आरामशीनच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संपूर्ण लकडगंजचा परिसर टिम्बर मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात शोकडो आरामशीनचे कारखाने आहेत. आज सकाळी एका कारखान्याला आग लागली असून, गेल्या काही तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी आत्तापर्यंत अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. आग नेमकी कशी लागली अद्याप या संदर्भात माहिती पुढे आलेली नाही. मात्र, आगीत कोट्यवधी रुपयांचे लाकूड जाळून राख झाल्याची माहिती मिळाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST