ETV Bharat / state

धक्कादायक! मुलगी पळवल्याच्या संशयावरून कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाची हत्या, दोघे गंभीर - वैजापूर हत्याकांड बातमी

वैजापूर तालुक्याती खंडाळा गावच्या शेतवस्तीवर गायकवाड आणि देवकर कुटुंब शेजारी शेजारी राहतात. बाळासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा अमोल हा ३ दिवसांपूर्वी कामाला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घराकडे फिरकलेला नाही.

वैजपुरमध्ये एकाची हत्या, तर दोन जण जखमी
वैजपुरमध्ये एकाची हत्या, तर दोन जण जखमी
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:23 PM IST

औरंगाबाद - शेजारच्या तरुणाने आपली मुलगी पळवून नेली या संशयावरून मुलीच्या घरच्यांनी त्या तरुणाच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात संशयित मुलाच्या भावाचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतील खंडाळा गावात शनिवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात तरुणाचे आई-वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी रोहिदास देवकर आणि देविदास देवकर या दोन आरोपी भावांना अटक केली आहे.

वैजापूर तालुक्याती खंडाळा गावच्या शेतवस्तीवर गायकवाड आणि देवकर कुटुंब शेजारी शेजारी राहतात. बाळासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा अमोल हा ३ दिवसांपूर्वी कामाला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घराकडे फिरकलेला नाही. विशेष म्हणजे शेजारी राहणार्‍या देवकर कुटूंबातील मुलगीदेखील नेमक्या याच सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. त्यामुळे शेजारी राहणार्‍या अमोलनेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर भावांनी घेतला. या संशयावरून शनिवारी रात्री रोहिदास आणि देविदास हे दोन्ही भाऊ तलवार व कोयते घेऊन गायकवाड यांच्या घरावर चालून आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या गायकवाड कुटुंबावर हल्ला चढवला.

हेही वाचा - Coronavirus : औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायाला लागली घरघर

या हल्ल्यात अमोलची आई अलकाबाई गायकवाड (41) आणि वडील बाळासाहेब गायकवाड (47) गंभीर जखमी झाले. या अवस्थेतही त्यांनी भाऊ दादासाहेब गायकवाड यांचे घर गाठून हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब गायकवाड यांचा दुसरा मुलगा भीमराज (17) हा घरात झोपलेला होता. घराबाहेर काय चालले आहे हे समजण्यापूर्वीच देवकर भावांनी तो झोपेत असतनाच तलवारीने वार करून त्याचे शीर धडावेगळे केले आणि तेथून पसार झाले.

या अमानुष घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. अमोलच्या जखमी आई-वडीलांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, भीमराजचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

हेही वाचा - राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण; राज्यातील एकूण संख्या 32 वर पोहोचली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.