ETV Bharat / health-and-lifestyle

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीर देतो 10 संकेत - WARNING SIGNS OF HIGH CHOLESTEROL

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात? कोलेस्टेरॉल होण्याचा धोका कोणाला असतो? सविस्तर जाणून घ्या या प्रशनांची उत्तरं.

WARNING SIGNS OF HIGH CHOLESTEROL  SYMPTOMS OF HIGH CHOLESTEROL  10 SIGNS OF HIGH CHOLESTEROL
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीर देतो 10 संकेत (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 19, 2025, 3:04 PM IST

Warning Signs Of High Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा एक जीवनशैलीचा आजार आहे. जो जगभरातील लोकांना प्रभावित करतो. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यानx लठ्ठपणा, हृदयरोग आणि स्ट्रोक यासारख्या विविध आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉल सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. अस्वस्थ आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, धूम्रपान आणि झोपेचा अभाव हे सर्व घटक वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. कोलेस्टेरॉल नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ते शरीराच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. बरेच लोक सुरुवातीच्या टप्प्यात कोलेस्ट्रॉल ओळखू शकत नाहीत. यामुळे रोगाची गुंतागुंत होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि उच्च कोलेस्ट्रॉलची १० लक्षणं कोणती ते जाणून घ्या.

  1. छातीत दुखणे: छातीत दुखणे किंवा अस्वस्थता हे उच्च कोलेस्ट्रॉलच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. विशेषतः व्यायामादरम्यान छातीत दुखणे.
  2. पायांमध्ये वेदना आणि पेटके: पाय दुखणे किंवा पेटके येणे, विशेषतः चालताना किंवा बराच वेळ उभं राहिल्यावर ही समस्या दिसून येते.
  3. त्वचेतील बदल: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानं त्वचेचा रंग खराब होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांभोवती, गुडघ्यांमध्ये आणि कोपरांमध्ये पिवळेपणा जाणवत असेल तर ताबडतोब तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी तपासा.
  4. चक्कर येणे: वारंवार चक्कर येणे किंवा मायग्रेन हे देखील कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे.
  5. श्वास घेण्यास त्रास: उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना अनेकदा छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
  6. थकवा: जास्त थकवा हे देखील एक प्रमुख लक्षण आहे. तुम्हाला पचनाच्या समस्या येऊ शकतात, ज्यामध्ये
  7. पोट फुगणे: पोट फुगणे किंवा खाल्ल्यानंतर वेदना होणे यांचा समावेश असू शकतो.
  8. हृदयविकाराच्या झटका: उच्च कोलेस्ट्रॉल हे देखील हृदयविकाराचे एक लक्षण आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
  9. जबड्यात वेदना
  10. मानेच्या मागच्या भागात वेदना
  • उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कोणाला असतो?
  • जर पालकांपैकी एकालाही उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर त्यांच्या मुलांना ते वारशाने मिळण्याची शक्यता जास्त असते.
  • जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ असलेल्या लोकांनाही उच्च कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका असतो.
  • जे लोक जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स किंवा ट्रान्स फॅट्स असलेले अन्न खातात त्यांनीही काळजी घ्यावी.
  • जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा धूम्रपान करतात त्यांना उच्च कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता जास्त असते.
  • व्यायाम न केल्यानेही कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी नाश्त्यात काय समाविष्ट करावे?
  • अक्रोड: अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक असतात. तुमच्या नाश्त्यात अक्रोडाचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. तसंच यामुळे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत होईल.
  • बदाम: शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास बदाम मदत करतात. हेल्थ हार्वर्ड एज्युकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
  • ऑलिव्ह ऑइल:ऑलिव्ह ऑइल चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करू शकते.
  • जवस: जवस हे अशा पदार्थांपैकी एक आहे ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. सलग तीन महिने सकाळी जवसाच्या बियांचा पावडर खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास फायदा होते.
  • संत्र्याचा रस: संत्री हे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात. राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि आरोग्य तज्ञ म्हणतात की यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.health.harvard.edu/heart-health/11-foods-that-lower-cholesterol

https://medlineplus.gov/howtolowercholesterolwithdiet.html

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/16954359/

https://www.nhs.uk/conditions/high-cholesterol/how-to-lower-your-cholesterol/

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.