पणजी - रशियातील मॉस्को येथे होणाऱ्या अॅरोफ्लोट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी गोव्याचे प्रतिभावंत फिडे मास्टर बुद्धिबळपटू नितीश बेलुरकर याची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
दिल्लीमध्ये राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नितीश याची निवड करण्यात आली आहे. नितीश याच्या निवडीने गोव्यामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच गोवा बुद्धिबळ संघटनेने नितीश याचे अभिनंदन केले आहे. दरम्यान याआधी त्याने देश-विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.