मुंबई How to Buy Match Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा T20 सामना 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरु असलेल्या T20 मालिकेमुळं क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दोन्ही संघांमधील सामना सतत रोमांचक होत असतो, भारतीय चाहते या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत.
For his vital half-century, Shivam Dube bagged the Player of the Match Award in the fourth #INDvENG T20I. 👍 👍
— BCCI (@BCCI) January 31, 2025
Scorecard ▶️ https://t.co/pUkyQwxOA3#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rMbxYog0mO
तिकिट विक्रीला विलंब : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या T20 सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीत झालेल्या विलंबामुळं चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर याबद्दल निराशा व्यक्त केली आणि ऑनलाइन तिकिटांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. चाहत्यांनी सांगितलं की सामना जसजसा जवळ येत आहे तसतसं तिकिटं बुक करण्यात अडचणी येत आहेत.
An all-round show helps India clinch the T20I series in Pune, taking an unassailable 3-1 lead 👏#INDvsENG 📝: https://t.co/pZoGk04y47 pic.twitter.com/rxSeWCVy7J
— ICC (@ICC) January 31, 2025
मालिका भारताच्या खिशात : तत्पुर्वी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 मध्ये शानदार विजय नोंदवून भारतानं T20 मालिकाही जिंकली. टीम इंडियानं चौथा T20 सामना 15 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 20 षटकांत 181 धावा केल्या. ही धावसंख्या इंग्लंडसाठी खूप जास्त ठरली आणि परिणामी त्यांनी पुण्यात हार मानली. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो होते. त्यांच्याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनीही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कधी आणि कशी खरेदी करायची तिकिटं : या सामन्याची तिकिटं आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होतील अशी घोषणा केली आहे. आता चाहते डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो मोबाईल अॅपवरुन ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात. त्याच वेळी, जर तुम्हाला ऑफलाइन तिकिटे खरेदी करायची असतील तर वानखेडे स्टेडियमच्या तिकीट खिडकीवरुनही तिकिटं खरेदी करता येतील. या मालिकेतील प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी खास आहे आणि आता तिकिटांची उपलब्धता निश्चित झाली आहे, त्यामुळे चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सामन्यासाठी कमीत कमी तिकिटाची किंमत ही 1000 रुपये आहे तर जास्तीत जास्त 4000 रुपये आहे.
Tomorrow there is a match in wankhede and its still showing coming soon! What is the issue? @lifeindistrict @carebydistrict @zomato @Paytm @BCCI
— Vishal Parmar (@vishal_blogger) February 1, 2025
And I have been trying since last 10 days! There is no sign of buying any ticket yet. pic.twitter.com/rE7UDy5mT0
भारत-इंग्लंड T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा : आगामी T20 मालिकेतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तुम्ही हे सामने जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय, स्पोर्ट्स 18 वर थेट प्रक्षेपण देखील पाहता येईल. हे सामने जिओ सिनेमाच्या वेबसाइट आणि अॅप्लिकेशनवर प्रसारित केले जातील.
हेही वाचा :