नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Elections 2025) निकाल आज (8 फेब्रुवारी) लागणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी बुधवारी (5 फेब्रुवारी) मतदान झालं होतं. तर आज निकालानंतर दिल्लीतील जनतेनं सत्तेची चावी कुणाच्या हाती दिली हे स्पष्ट होईल. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP), भाजपा (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे तीनही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. तर विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. जर खरंच भाजपाला बहुमत मिळालं तर भाजपा 27 वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्तेत येईल.
अशा परिस्थितीत, मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते भाजपामधील इतर नेत्यांपर्यंत सर्वांनाच निवडणूक प्रचारात भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असेल? भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळं यावरुन विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत.
संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान नवी दिल्ली मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रवेश वर्मा ज्या प्रकारे चर्चेत राहिले, जर भाजपाला बहुमत मिळालं तर त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये समाविष्ट केलं जाईल. त्याचप्रमाणे, विधानसभेत दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते बनलेले विजेंदर गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळाच्या शेवटी कॅग अहवालावरून आम आदमी पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं तेदेखील एक मजबूत दावेदार देखील असू शकतात.- नवीन गौतम, राजकीय विश्लेषक
इतर नावांबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी पक्षानं करोल बाग विधानसभा राखीव जागेवरून दुष्यंत गौतम यांना तिकीट दिलंय. त्यांचा जन्म दिल्लीतील मलका गंज येथे झाला. दुष्यंत गौतम हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांनी संघटनेत विविध पदांवर काम केलंय. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेले दुष्यंत गौतम शिक्षण पूर्ण केल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय अध्यक्ष बनले. ते तीन वेळा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी संघटना आणि राजकारण जितकं जवळून पाहिलंय ते लक्षात घेता, ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी एक प्रबळ दावेदार असू शकतात.- मनोज मिश्रा, राजकीय विश्लेषक
रमेश बिधुडी यांचंही नाव चर्चेत : आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार रमेश बिधुडी यांचं नाव भाजपापेक्षा आम आदमी पक्षानं चर्चेत आणलं आहे. भाजपा बिधुडी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहे का? असा सवाल अनेकदा 'आप'कडून करण्यात आलाय. दरम्यान, बिधुरी हे दोनदा दिल्लीचे खासदार राहिलेत. याशिवाय त्यांनी दिल्ली विधानसभेचे सदस्य म्हणूनही दीर्घकाळ जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
दिल्ली विधानसभा इतिहास : दिल्ली विधानसभेच्या इतिहासावर नजर टाकली तर 27 वर्षांपूर्वीदेखील अशीच परिस्थिती होती. 1998 च्या अखेरीस, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर सत्ताधारी पक्ष भाजपानं विद्यमान मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांना काढून टाकलं. सुषमा स्वराज यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं डिसेंबर 1998 च्या विधानसभा निवडणूक लढविली होती. पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दिल्लीत कांद्याच्या किमतीत अचानक वाढ झाली. ती वाढ कमी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप साहिब सिंग वर्मा यांच्यावर करण्यात आला. पक्षानं महिला नेत्या सुषमा स्वराज यांना पुढं आणून मुख्यमंत्री बदललं. मात्र, तो मुद्दा इतका मोठा झाला की भाजपा पुन्हा सरकार स्थापन करू शकला नाही. तेव्हापासून भाजपा दिल्लीत सत्तेपासून दूर आहे.
हेही वाचा -