ETV Bharat / state

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं विविध पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी - MARATHI BHASHA GAURAV DIN 2025

राज्य सरकारकडून २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार राज्य शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आले आहेत.

Marathi Bhasha Gaurav Din various awards announced by state government, read the full list
मराठी भाषा गौरव दिन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 9:47 AM IST

मुंबई : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) विविध मान्यवर साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना गौरविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

'या' ठिकाणी होणार पुरस्कार वितरण सोहळा :
मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिल्या जाणारा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होण्याची गरज आहे. त्यामुळं यावर्षीपासून हे पुरस्कार गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य स्वरूपात प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरस्कार निवडीसाठी साहित्य क्षेत्रातील तज्ञ समित्या कार्यरत आहेत. निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप किंवा वशिलेबाजी होत नाही. या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब गंगाराम बोराडे यांना जाहीर करण्यात आलाय. तर ‘श्री. कु. भागवत पुरस्कार’ प्रकाशन संस्थेसाठी ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे यांना देण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाचे पुरस्कार :

  1. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार – डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी
  2. श्री. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार – भीमाबाई जोंधळे
  3. कवी केशवसूत पुरस्कार– एकनाथ पाटील
  4. राम गणेश गडकरी नाटक/एकांकिका पुरस्कार – मकरंद साठे
  5. हरिनारायण आपटे कादंबरी पुरस्कार – आनंद विणकर
  6. दिवाकर कृष्ण लघुकथा पुरस्कार – दिलीप नाईक निंबाळकर
  7. अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार –अंजली जोशी
  8. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार – शेखर गायकवाड
  9. न. चिं. केळकर पुरस्कार – विवेक गोविलकर
  10. लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार – डॉ. वसंत राठोड
  11. श्री. के. क्षीरसागर समीक्षा पुरस्कार – समीर चव्हाण
  12. शाहू महाराज पुरस्कार- प्रकाश पवार
  13. नरहर कुरुंदकर पुरस्कार- उज्ज्वला जोगळेकर
  14. महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार- सुबोध जावडेकर
  15. वसंतराव नाईक पुरस्कार- डॉ. विजय बोरा
  16. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- सुनीता सावरकर
  17. ना. गो. नांदापूरकर पुरस्कार - या.रा. जाधव
  18. कर्मवीर भाऊराव जाधव पुरस्कार- हेमंत चोपडे
  19. डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार- माधव गाडगीळ
  20. रा.ना. चव्हाण पुरस्कार- संपादक रविमुकुल
  21. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार- अनुवादक श्रीकांत अरुण पाठक
  22. भाई माधवराव बागल पुरस्कार- सुप्रिया राज
  23. बालकवी पुरस्कार -प्रशांत असनारे
  24. भा.रा. भागवत पुरस्कार संजय शिंदे
  25. साने गुरुजी पुरस्कार- रेखा बैजल
  26. बहिणाबाई चौधरी पुरस्कार - तान्हाजी रामदास बोर्हाडे
  27. विजय तेंडुलकर पुरस्कार- हरीश बोढारे
  28. श्री. ना. पेंडसे पुरस्कार- प्रदीप कोकरे
  29. ग. ल. ठोकळ पुरस्कार - डॉ. संजय कुलकर्णी
  30. ताराबाई शिंदे पुरस्कार - गणेश मनोहर कुलकर्णी
  31. सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - अनुवादक योगिनी मांडवगणे

साहित्याच्या विकासासाठी ‘कवितांचं गाव’ आणि ‘पुस्तकांचं गाव’ संकल्पना :
यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. ‘कवितांचं गाव’ ही संकल्पना कुसुमाग्रजांचे वास्तव्य असलेल्या नाशिकमधील शिरवाड येथे राबवली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत गावातील 35 घरांमध्ये वाचनालय स्थापन करून इथं केवळ कवितांची पुस्तकं ठेवली जातील. तर ‘पुस्तकांचं गाव’ रत्नागिरी जिल्ह्यातील स्मारक गावात सुरू करण्यात येणार आहे. येथे 35 घरांमध्ये प्रत्येकी 1,000 नवी कोरी पुस्तकं ठेवली जाणार आहे. जेणेकरुन लहान मुलं, युवक आणि वाचकवर्गाला दर्जेदार साहित्य वाचता येईल.

पुरस्कार वितरण सोहळा आणि उद्घाटन कार्यक्रम : हा पुरस्कार वितरण सोहळा 27 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडेल. तसंच ‘कवितांचं गाव’ या उपक्रमाचं उद्घाटन 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या वास्तव्यस्थानी होईल. तर ‘पुस्तकांचं गाव’ पुढील महिन्यात औपचारिकरित्या सुरू करण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या वतीनं सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावं, असं आवाहनही केलं.

हेही वाचा -

  1. मराठी भाषा गौरव दिन विशेष - अमृतासी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य असलेल्या माय मराठीची अविट गोडी
  2. "भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...", कुसुमाग्रजांच्या नावानं उभारलेलं उद्यान मोजतंय अखेरच्या घटका
  3. Elite Status for Marathi: मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पंतप्रधानांकडून वाटाण्याच्या अक्षता; अभिजात दर्जापासून मराठी भाषा वंचित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.