दुबई Squad for Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला मिळालं आहे. पण ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल, जिथं टीम इंडियाचे सर्व सामने यूएईच्या भूमीवर होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी इथं खेळवले जातील. आता सर्व संघांनी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेसाठी, 8 संघांना दोन गटात विभागण्यात आलं आहे, प्रत्येक गटात चार संघ आहेत. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.
अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच सहभागी : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. यात भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ समाविष्ट आहेत. या 8 संघांपैकी फक्त भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघच विजेतेपद जिंकू शकले आहेत. बांगलादेश, इंग्लंडनं अद्याप जेतेपद जिंकलेलं नाही. तर, अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी गट आणि संघ :
- गट अ : भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान
- गट ब : अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका
गट-अ मधील सर्व संघ :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
India's squad for the #ChampionsTrophy 2025 announced! 💪 💪
— BCCI (@BCCI) January 18, 2025
Drop in a message in the comments below 🔽 to cheer for #TeamIndia pic.twitter.com/eFyXkKSmcO
- बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.
Ready for Pakistan and UAE 🏏 #ChampionsTrophy pic.twitter.com/Q4tbhqm0xi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 11, 2025
- न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
- पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
ICC Champions Trophy 2️⃣0️⃣1️⃣7️⃣ winners announce squad for the 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ event 🏆✨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 31, 2025
How will you show your support for the Pakistan team❓#ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/zDYPFuqzBU
गट-ब मधील सर्व संघ :
- अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान.
Happy with our 15-member #AfghanAtalan lineup for the ICC Champions Trophy!? 🤩🏆#ChampionsTrophy 🔗: https://t.co/uZfvLZ8U8D pic.twitter.com/7bmUJuzHFb
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 12, 2025
- इंग्लंड : जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
Our preliminary squad for the 2025 @ICC #ChampionsTrophy is here 🔥 pic.twitter.com/LK8T2wZwDr
— Cricket Australia (@CricketAus) January 13, 2025
- ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.
🚨SQUAD ANNOUNCEMENT🚨
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 13, 2025
White-ball head coach Rob Walter has today announced a 15-member squad for the ICC Champions Trophy 2025, which will be played in Pakistan from 19 February – 09 March.
One-Day International captain Temba Bavuma will lead the full-strength squad, which… pic.twitter.com/Bzt0rqjveG
- दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जियोर्गी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रास व्हॅन डर ड्यूसेन.
हेही वाचा :