महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'मायलेकी' पूजा बेदी आणि अलाया एफ आणि राशा थडानी रेस्टॉरंट बाहेर झाल्या स्पॉट - RASHA THADANI - RASHA THADANI

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 5:19 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सौंदर्यामुळं लोकांच्या कायम स्मरणात राहिली. तिच्याच पावलावर पाऊल टाकत तिची मुलगी राशा थडानीही चित्रपटाच्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. राशानं अद्याप रुपेरी पदार्पण केलं नसलं तरी ती अनेकदा तिच्या स्टाईलमुळे प्रसिद्धी मिळवते. 19 वर्षीय राशाचे सोशल मीडिया अकाउंटही तिच्या आकर्षक फोटोंनी भरलेलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी असलेली ही स्टारकीड तिच्या कारमधून बाहेर पडून जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसली. सैल जीन्ससह ऑफ-शोल्डर पांढरा टॉप परिधान केलेली राशा थडानी नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. दरम्यान, आलिया एफ आणि तिची आई पूजा बेदीबरोबर मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आली. आलिया कॅज्युअल लूकमध्ये दिसत असताना, पूजा बेदीनं नाईट आऊटसाठी एक को-ऑर्डर सेट केला आहे. शहरातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभं असलेल्या पापाराझींसाठी माय लेकी हसतमुख चेहऱ्यानं फोटोसाठी पोज देताना दिसले.

ABOUT THE AUTHOR

...view details