राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 18.75 लाख किमतीचा मद्यसाठा जप्त - STATE EXCISE DEPARTMENT
Published : Oct 27, 2024, 7:18 AM IST
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Departmen) अॅक्टिव मोडवर आल्याचं बघायला मिळतंय. शनिवारी (26 ऑक्टोबर) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं परराज्यातील भारतीय बनावटीच्या केवळ दादरा आणि नगर हवेली येथे विक्री करण्याची परवानगी असलेल्या 18.75 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोघजण मुंब्रा बायपास रोडवरुन मद्यसाठा घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्यांना पकडलं. आरोपी घेऊन जात असलेल्या टेम्पोतून 120 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सुरज इंदाराम मेघवाल आणि राम लाल डवरा या दोघांना अटक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागू केल्यानं पोलिसासह प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागत आहे.