महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"एसटी बसचे केलेत लॉज, कंडोमचा पडलाय खच" वसंत मोरे यांची माहिती, सुरक्षा रक्षकांच्या केबीनची संतप्त शिवसैनिकांनी केली तोडफोड - PUNE GIRL RAPE

🎬 Watch Now: Feature Video

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 6:34 PM IST

Updated : Feb 26, 2025, 9:08 PM IST

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. "आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या" असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी शिवसेना नेते वसंत मोरे म्हणाले "स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. स्वारगेट आगारात २० सुरक्षा रक्षक असताना एका महिलेवर अन्याय झाला. ही निषेधार्य बाब आहे. म्हणून आम्ही तीव्र आंदोलन केलं."  

Last Updated : Feb 26, 2025, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details