महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"बीडमधील प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांकडून प्रोत्साहन...", पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर निशाणा - PUNE JANAKROSH MORCHA

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 9:36 AM IST

पुणे : पुण्यामध्ये रविवारी (5 जाने.) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) निषेध करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा (Pune Janakrosh Morcha) काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक तसंच विविध पक्षाचे राजकीय नेतेदेखील सहभागी झाले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी  माध्यमांशी संवाद साधत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  उद्योग राज्यात येत नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार होत असल्याचं ते म्हणाले. तसंच बीडमधील प्रकरणाला सरकारमधील मंत्र्यांकडून प्रोत्साहन दिलं जातंय. ही खूप गंभीर बाब आहे, असेदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details