मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मा सध्या क्रिकेटर पती युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. धनश्रीचं नाव सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडलं जात आहे. धनश्रीबरोबर अफेअरच्या अफवांदरम्यान प्रतीक उतेकरनं आता याप्रकरणी आपले मौन सोडले आहे. त्यानं अशा दावे करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 2023 मध्ये धनश्री वर्मा आणि प्रतीक उतेकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो प्रतीकनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. या फोटोमध्ये धनश्रीला प्रतीकनं मिठीत पकडलं होतं. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलचा घटस्फोट : धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलसोबत घटस्फोटच्या बातम्यांदरम्यान, प्रतीक उतेकरची पोस्ट सोशल मीडियावर आता चर्चेत आली आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'फक्त फोटो पाहून, जग काहीही कहाणी तयार करतात. कमेंट करण्यासाठी आणि संदेश पाठवण्यासाठी कोणीही रिकामे आहे.' प्रतीक उतेकरची ही इंस्टाग्राम स्टोरी 7 डिसेंबर 2024ची आहे. आता सोशल मीडियावर धनश्री वर्मा आणि प्रतीक उतेकरबद्दल जोरदार चर्चा होत आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्रीनं काही दिवसांपूर्वी एकमेंकांना अनफॉलो केलं होतं. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीला हवा मिळाली होती.
कोण आहे प्रतीक उतेकर? : प्रतीक उतेकरबद्दल बोलायचं झालं तर तो मुंबईचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. प्रतीक 'डान्स दिवाने ज्युनियर' आणि 'नच बलिये 7' या डान्स रिॲलिटी शोचा विजेता होता. या कोरिओग्राफरनं सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा आणि नोरा फतेहीसह अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. दुसरीकडे धनश्री वर्मा ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून ती देखील एक सुंदर डान्सर आहे. धनश्रीनं आतापर्यंत सोशल मीडियावरून आपल्या पतीबरोबरचे फोटो हे डिलीट केलेले नाहीत, मात्र युजवेंद्र चहलनं आपल्या पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केले आहेत.
हेही वाचा :