ETV Bharat / state

जोडाजोडी : आगामी निवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र येणार का? नेमकं 'राज'कारण काय? - ASHISH SHELAR MEET RAJ THACKERAY

आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील 16 महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

Ashish Shelar meet Raj Thackeray
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

Updated : 16 hours ago

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. या निवडणुका मिनी विधानसभेप्रमाणेच होतील, असं म्हटलं जातंय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील 16 महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. अशातच राज ठाकरे यांच्या पक्ष बैठकीनंतर आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याने भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात.

राज ठाकरेंबाबत भाजपाची नेहमीच मैत्रीपूर्ण भूमिका : आशिष शेलार यांच्या भेटीनंतर लगेचच मोहित कंबोज यांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. आता या दोन्ही भाजपा नेत्यांची राज ठाकरेंसोबत झालेली चर्चा आणि त्यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट ही एक सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात असले तरी यामागे येत्या पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याच्या सध्या चर्चा आहेत. यावर आता थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरेंबाबत भारतीय जनता पक्ष नेहमीच मैत्रीच्या भूमिकेत राहिलाय. त्यांच्याशी आमचे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध आहेतच, पण आमचे वैचारिकदेखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बाळासाहेबांचे विचार, त्यांचं हिंदुत्व राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. भाजपाचे विचार आणि राज ठाकरेंच्या मनसेचे विचार सारखेच असल्याने आम्ही पूर्वीपासूनच त्यांच्याबाबत सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

राज ठाकरे आणि आशिष शेलार ही केवळ सदिच्छा भेट : या संदर्भात आम्ही भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सदिच्छा भेट होती. आशिष शेलार आता मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागांतर्गत काही चर्चा झालेली असू शकते. आताच विधानसभा निवडणुका झाल्यात. आपलं नवीन सरकार बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची केवळ सदिच्छा भेट होती, इतकाच अर्थ आहे. यात दुसरा कोणताही अर्थ नाही, असं उपाध्ये यांनी म्हटलंय.

मनसे आणि भाजपा युतीची चर्चा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीतील मनसे आणि महायुतीसोबतच्या चर्चा एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिस्कटल्याच्या चर्चा रंगल्यात. यावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, विधानसभा निवडणुकीत संवादाचा अभाव राहिल्याचं देशपांडे यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जागावाटपाच्या चर्चा खूप लांबल्या होत्या. त्यातच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मनसेसोबत युतीबाबत चर्चा सुरू झाल्यात. मात्र, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. संवादातील कमतरता आणि मागे झालेल्या चुका टाळून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने चर्चा करायला हवी, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलीय.

मोदींसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा : दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या सभेत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. या निवडणुकीत मनसे भाजपा युती होईल, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र तसं देखील झालं नाही. पुढे राज ठाकरे यांनी विधानसभेतदेखील स्वबळाचा नारा दिला. आता पालिका निवडणुका तोंडावर असताना या निवडणुकीतदेखील मनसे भाजपा युतीच्या चर्चा सुरू झाल्याने पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. नागपुरात एचएमपीव्हीचा एकही सक्रिय रुग्ण नाही, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची माहिती
  2. ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस...अवघड नाव पण सौम्य विषाणू, मागील वर्षी भारतात आढळले होते 'इतके' रुग्ण

Last Updated : 16 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.