गकबेर्हा SEC vs MICT SA20 1st Match Live : दक्षिण आफ्रिकेची T20 लीग SA20 आजपासून म्हणजेच 9 जानेवारीपासून सुरु होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल.
One sleep away. pic.twitter.com/2NhR4aFyU9
— Sunrisers Eastern Cape (@SunrisersEC) January 8, 2025
दोन्ही संघात काटे की टक्कर : आजपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ पूर्ण तयारीत असल्याचं दिसत आहे. गत हंगामातील चॅम्पियन संघ सनरायझर्स इस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांना त्यांच्या पहिल्याच सामन्यातून पुन्हा गती मिळवायची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळू शकते. या स्पर्धेत सनरायझर्स इस्टर्न केपची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. तर, एमआय केपटाऊनचं नेतृत्व राशिद खान करत आहे.
🗣️ The Captain speaks 💙#MICapeTown #OneFamily #RashidKhan pic.twitter.com/b7ecvhIBDL
— MI Cape Town (@MICapeTown) January 8, 2025
सहा संघ आपापसात भिडणार : या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. ही लीग 2023 मध्ये सुरु झाली होती आणि तेव्हापासून तिचे दोन हंगाम पूर्ण झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघानं विजेतेपद पटकावलं आहे. या मोसमात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे.
The stage is set. The players are ready. Season 3, here we come! 💪#MICapeTown #OneFamily #RashidKhan #CaptainsDay pic.twitter.com/Zj86kRmMi6
— MI Cape Town (@MICapeTown) January 8, 2025
आयपीएलच्या धर्तीवर सुरु झाली लीग : आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2023 पासून टी 20 लीग सुरु झाली. आयपीएलच्याच मालकांनी या लीगचे सर्व संघ विकत घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सनं पर्ल संघ विकत घेतला. यासह एमआय केप टाऊन, जॉबर्ग सुपर किंग्स, डर्बन सुपर जायंट्स, प्रिटोरिया कॅपिटल्स आणि सनरायझर्स इस्टर्न केप या संघांचा या लीगमध्ये समावेश आहे.
#BetwaySA20 Captains are ready ✅ #WelcomeToIncredible pic.twitter.com/KeimPkcUL3
— Betway SA20 (@SA20_League) January 8, 2025
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील पहिला सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील स्पर्धेतील पहिला सामना आज गकबेर्हा येथील सेंट जॉर्ज पार्क इथं खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध MI केपटाउन यांच्यातील सामन्याचं भारतातील स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
St George's Park - Where Champions Come Home 🏆 #BetwaySA20 #WelcomeToIncredible pic.twitter.com/h8QOZyyrPs
— Betway SA20 (@SA20_League) January 8, 2025
सामन्यासाठी दोन्ही संघ :
एमआय केपटाऊन : रशीद खान (कर्णधार), बेन स्टोक्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, अजमातुल्ला उमझाई, डेवाल्ड ब्रेव्हिस, रायन रिकेल्टन, जॉर्ज लिंडे, नुवान थुशारा, कॉनर एस्टरहुइझेन, डेलानो पोटगिएटर, रॅसी व्हॅन डर डुसेन, थॉमस बेंजामिन, कॉर्बिन बॉश, कॉलिन इंग्राम, रीझा हेंड्रिक्स, डेन पिएड, ट्रिस्टन लुस.
सनरायझर्स ईस्टर्न केप : एडन मार्कराम, जॅक क्रॉली, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लियाम डॉसन, ओटनीएल बार्टमन, मार्को जेन्सन, बेअर्स स्वानेपोएल, कॅलेब सेलेका, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्डन हरमन, पॅट्रिक क्रुगर, क्रेग ओव्हरटन, टॉम एबेल, सायमन हार्मर, अँडिले सिमेलेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ओकुहले सेले, रिचर्ड ग्लीसन, डॅनियल स्मिथ
हेही वाचा :