ETV Bharat / state

आता घरबसल्या करा दस्त नोंदणी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' योजना - ONE STATE ONE REGISTRATION

नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारणं आता बंद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन योजना घोषित केली आहे.

One State One Registration
मंत्रिमंडळ बैठक (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 11 hours ago

Updated : 11 hours ago

मुंबई : आपल्याकडं एक उपरोधिक म्हण आहे, सरकारी काम आणि दहा महिने थांब. कोणत्याही छोट्यात छोट्या शासकीय कामासाठी जाणारा प्रचंड कालावधी, हेलपाटे मारणे यातून ही म्हण जन्माला आली. मात्र, आता लोकांचे हेलपाटे लवकरच बंद होणार आहेत. कोणत्याही नोंदणीच्या कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार जावं लागते. त्यात जाणारा वेळ वाचावा यासाठी 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली आहे.

आता घरबसल्या करा दस्त नोंदणी : याबाबत अधिकची माहिती अशी की, "कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात दस्त नोंदणी करण्याकरता 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' ही संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे नागरिकांना आता घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार आहे. सोबतच महसूल विषयक दस्त नोंदणी करता फेसलेस प्रणाली देखील राबवली जाणार आहे," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. "यासाठी पुढील शंभर दिवसांचा आराखडा तयार केला जात असून, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठक घेण्यात आली," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर झाली बैठक : सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील भूमापनासाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई मोजणी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोबतच, जसा आपल्याला सध्या घरबसल्या पासपोर्ट काढता येतो, त्याप्रमाणं भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात 30 भू प्रमाण केंद्र सुरू केली जाणार आहेत." सोबतच जनतेला सुलभ वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी देखील विशेष धोरण राबवलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. त्रिशंकू क्षेत्रातील गावं टाकणार कात; विकास करण्यासाठी महसूल विभाग करणार काम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
  2. मलईदार खात्याकरिता मंत्री अडून, फडणवीसांकडून विकासाचे पर्व-शिवसेना यूबीटीकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
  3. अहेरी ते गर्देवाडा बससेवा पहिल्यांदाच सुरू; देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांनी नक्षलवाद नाकारल्यानं उगवली नवी पहाट

Last Updated : 11 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.