ETV Bharat / entertainment

सुपरस्टार यशच्या बिग बजेट 'टॉक्सिक'चं दिग्दर्शन करणाऱ्या गीतू मोहनदास कोण आहेत? - GEETU MOHANDAS

दिग्दर्शिका गीतू मोहनदास यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपट बनवत असल्यामुळं चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आजवर केलेल्या कामावर एक नजर टाकूयात.

'Toxic' poster and Geetu Mohandas
'टॉक्सिक' पोस्टर आणि गीतू मोहनदास (Image source 'Toxic' poster and @geetu_mohandas Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 8, 2025, 6:14 PM IST

Updated : Jan 8, 2025, 7:14 PM IST

मुंबई - साऊथचा सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. हा एक भव्य दिव्य अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात यश अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर यशला केजीएफच्या दोन्ही भागात एका कणखर व्यक्तीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलंय. आता तो आगामी 'टॉक्सिक: ए डार्क फेयरीटेल' या चित्रपटात पुन्हा एका बलदंड व्यक्तिरेखा साकरताना दिसत आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टिझरमध्ये आपल्याला त्याचा हा रांगडा अवतार दिसला आहे.

विशेष म्हणजे या 'टॉक्सिक: ए डार्क फेयरीटेल' चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोनदास करीत आहेत. एक महिला दिग्दर्शक असा भव्य रांगडा कलाकार घेऊन चित्रपट बनवत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु, दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवलेल्या गीतू मोहनदास यांनी या क्षेत्रातली आपली कामगिरी सिद्ध केली आहे.

कोण आहेत गीतू मोहनदास?

दिग्दर्शक गीतू मोहनदास या त्यांच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटामुळे चर्चेत आल्या आहेत. केरळमधील कोची येथे जन्मलेल्या 43 वयाच्या गीतू यांचं मूळ नाव गायत्री दास आहे. मल्याळम चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत असताना त्यांना गीतू मोहनदास हे नाव मिळालं. त्यांनी बालकलाकार म्हणून 1996 मध्ये दिग्गज अभिनेते मोहनलाल यांच्याबरोबर 'ओन्नू मुथल पूज्यम वारे' चित्रपटात पदार्पण केलं आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळवला होता. दिग्दर्शनात उतरण्याच्या आधी त्यांनी 'अकाले', 'नाला दमयंती' आणि 'सीता कल्याणम' यासारख्या अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.

गीतू मोहनदास यांनी 2009 मध्ये अनप्लग्ड या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'केलकुनुंडो' या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यानंतर त्यांनी 2013 मध्ये 'लायर्स डाइस' या फिचर फिल्मचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाची समीक्षकांकडून खूप प्रशंसा तर झालीच पण हा चित्रपट ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताची अधिकृत एंट्री होती. 'लायर्स डाइस' या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

गीतू मोहनदास यांनी बनवलेल्या प्रत्येक कलाकृतीचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झालंय. त्यांनी बनवलेल्या 'मूथन' या दुसऱ्या चित्रपटालाही सर्वत्र मान्यता मिळाली. विशेष म्हणजे, या चित्रपटाला सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लोबल फिल्ममेकिंग अवॉर्ड मिळाला होता.

आता गीतू मोहनदास 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या भव्य चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सुपरस्टार यशच्या बरोबर नयनतारा, कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी यांचा समावेश आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय. गोव्यातील माफियागिरीवर आधारित याचं कथानक आहे. या चित्रपटाचं शूटिंग अजून सुरू आहे. येत्या 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज करण्याचा विचार निर्मात्यांचा होता. मात्र काही कारणामुळे याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

Last Updated : Jan 8, 2025, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.