नागपूर पोलिसांनी ६० लाखांच्या दारूसाठ्यावर फिरवला बुलडोझर, पाहा व्हिडिओ - NAGPUR NEWS
Published : Jan 3, 2025, 10:39 PM IST
नागपूर : नागपूर पोलिसांनी आज तब्बल ६० लाखांपेक्षा अधिकच्या दारू साठ्यावर बुलडोझर चालवला आहे. गेल्या चार वर्षांत परिमंडळ पाच अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे अंतर्गत विविध कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला हा दारूसाठा होता. न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर आज पारडी पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दारूवर बुलडोझर फिरवण्यात आला. हे दृश्य बघण्यासाठी मैदानामध्ये लोकांनी गर्दी केली होती. तर शेजारीचं शाळा देखील असल्यानं विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी दारू समाजासाठी किती हानिकारक आहे, हे देखील विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दारूसाठा नष्ट : पोलिसांनी नष्ट केलेल्या दारूसाठ्यात हातभट्टीसह देशी, विदेशी दारूचा समावेश होता. तर तब्बल २० हजार पेक्षा अधिक बाटल्या नष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या पोलीस वर्धापन सप्ताह सुरू असल्यानं सर्वसामान्य जनतेच्या समोरच हा दारूसाठा नष्ट करण्यात आल्याचं झोन 5चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं.