जिद्दीने बिकट परिस्थितीत यश खेचून आणलं.. मुलगा सीए झाल्यानं भाजीविक्रेत्या महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू - dombivli vegetable seller video - DOMBIVLI VEGETABLE SELLER VIDEO
Published : Jul 17, 2024, 1:18 PM IST
|Updated : Jul 17, 2024, 4:47 PM IST
ठाणे Dombivli News: अपार कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर बिकट परिस्थितीत यश खेचून आणता येतं, याचे उदाहरण समोर आलं आहे. डोंबिवली येथील एका भाजी विक्रेत्या महिलेच्या मुलानं सीए परीक्षेत यश मिळवलं. सीए झाल्यावर मुलानं त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. तर जिद्दीनं यश मिळविणाऱ्या योगेश्वरवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक नागरिकांनी योगेशच्या आईचं अभिनंदन केलं. सीए परीक्षा पास झाल्यानंतर योगेशने आपल्या आईला पहिली भेट म्हणून साडी गिफ्ट केलीय. आपल्या मुलानं सीएची परीक्षा पास केली हे ऐकल्यावर आई नीरा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आयुष्य कृतार्थ झाल्याची भावना या माऊलीने बोलून दाखवली.