विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करु शकतो, मात्र...; काय म्हणाले अजित पवार - DCM Ajit Pawar - DCM AJIT PAWAR
Published : Apr 21, 2024, 1:42 PM IST
पुणे DCM Ajit Pawar : "विरोधी पक्षातील उमेदवार निवडून आला तर फक्त भाषण करु शकतो, निधी आणू शकत नाही. त्यामुळं सत्ताधारी पक्षातील लोकांना निवडून देणं गरजेचं आहे. याचा विचार तुम्ही करा," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर केलंय. "खडकवासला विधानसभा मतदारसंघांत काही सोसायटींचे प्रश्न आहेत. उमेदवार सुनेत्रा पवार आहेत. यावर्षी खडकवासला मतदारसंघात सर्वांनी मिळून काम करुया. पुणे विभागातील चारही उमेदवार निवडून आणू. देशाचा विकास आणि देशाचं नावलौकिक मोदींशिवाय दुसरं कोणी करु शकत नाही. त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त खासदार निवडून आणून आपण बळ देऊया," असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच "खडकवासला भागात सोसायटी मोठ्या आहेत. त्या सोसायटींमधले प्रश्न आहेत. ते प्रश्न माझ्यासमोर काहीजण मांडले मी खडकवासला भागात स्वतः यासाठी वेळ देईल. ते प्रश्न फार काही मोठे नाहीत सगळे प्रश्न आवाक्यातले आहेत, ते सोडवले जातील फक्त यावेळेस काम मात्र सगळ्यांनी मिळून करुया आणि निवडून आणूया," असं आवाहन अजित पवार म्हणाले.