नवी दिल्ली :Xiaomi नं आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Redmi Watch 5 Lite वॉच लॉन्च केली आहे. कंपनीनं हे घड्याळ 1.96 इंच AMOLED डिस्प्लेसह आणले आहे. घड्याळ अंगभूत GPS ट्रॅकरसह येते. रेडमी वॉच 5 लाइट कंपनीनं काळ्या आणि हलक्या सोनेरी रंगात आणली आहे. स्मार्ट घड्याळ 3 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. ऑफरसह हे घड्याळ 3 हजार 499 रुपयांना खरेदी केलं जाऊ शकतं. आज मध्यरात्री 12 पासून mi.com वरून घड्याळ खरेदी करता येईल.
हे आहेत फिचर :
- घड्याळ 1.96-इंच (410 x 502 पिक्सेल) AMOLED स्क्रीनसह 600 nits पर्यंत ब्राइटनेससह येते.
- रेडमी वॉच 200+ घड्याळात 50+फेसवॉच तसंच 30+ AOD स्क्रीन देण्यात आली आहे.
- रेडमी वॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप देखील तुम्हाला पहायाला मिळणार आहे.
- कॉलिंगसाठी, घड्याळात अंगभूत मायक्रोफोन, स्पीकर, कॉलसाठी 2-माइक ENC येतंय.
- घड्याळ ट्रॅकिंग, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटरिंग, पीरियड सायकल मॉनिटरिंग वैशिष्ट्यांसह येतंय.
- कंपनी 160+ स्पोर्ट्स मोड, 50+ विजेट कस्टमायझेशन, नाईट मोड, DND मोड, थिएटर मोड, वॉटर क्लिअरिंग मोडसह रेडमी वॉच खरेदी करता येणार आहे. यामध्ये 470mAh बॅटरी मिळतेय.