ETV Bharat / technology

प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसह किआ सायरोस भारतात ८.९९ लाख ते १६.९९ लाख रुपयांमध्ये लाँच - KIA SYROS LAUNCHED IN INDIA

Kia Syros भारतात लॉंच झालीय. ज्यामध्ये एक वेगळी बॉक्सी डिझाइन, पॉवर्ड व्हेंटिलेटेड सीट्स,लेव्हल-२ एडीएएससह एक अपमार्केट केबिन मिळतेय.

Kia Syros
किआ सायरोस (Kia india)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 1, 2025, 11:21 AM IST

हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये किआ सायरोस पहिल्यांदाच लोकांसमोर प्रदर्शित झाल्यानंतर ती अखेर भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालीय. किआची ज्याची किंमत ९ लाख ते १७.८० लाख रुपये ( एक्स-शोरूम) आहे . सायरोससाठी बुकिंग आधीच सुरू झाली होती, तर या कारची डिलिव्हरी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सहा विस्तृत प्रकारांमध्ये टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह ती ऑफर करण्यात आली आहे. किआ सायरोसबद्दल जाणून घेऊया सर्व माहिती...

किया सायरोस डिझाइन
किया सायरोसची डिझाइन किआ इलेक्ट्रिक एसयूव्ही, EV९ सारखी आहे, ज्यामध्ये मस्क्युलर स्टॅन्स आणि आधुनिक स्टाइलिंगचा वापर करण्यात आला आहे. तिचे फ्रंट प्रोफाइल स्लीक एलईडी डीआरएल आणि उभ्या स्टॅक केलेल्या ३-पॉड एलईडी हेडलाइट्सद्वारे हायलाइट केलं आहे. सायरोसमध्ये बॉक्सी साइड प्रोफाइल आहे. ही कारला १७-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर जाड बॉडी क्लॅडिंग आणि स्क्वेअर-ऑफ व्हील आर्चमुळं तिचा बांधा अधिक मजबूत झाला आहे. मागील बाजूस, त्यात एल-आकाराचे एलईडी लाईट्स आहेत, तर छतावर स्पॉयलर स्पोर्टी टच यात मिळतोय.

Kia Syros
किआ सायरोस (Kia)

किया सायरोस इंटीरियर
सायरोसमध्ये लेदरेट सीट अपहोल्स्ट्रीसह एक अपमार्केट केबिन लेआउट, विविध प्रकारांमध्ये बदलणारी ड्युअल-टोन थीम आणि २-स्पोक स्टीअरिंग व्हील आहे.

किया सायरोस वैशिष्ट्ये
किया सायरोस वायरलेस अ‍ॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटोसह १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले आणि ५-इंच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल स्क्रीन अशा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. किआनं त्यात ८-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम, पुढील आणि मागील प्रवाशांसाठी सीट व्हेंटिलेशन, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर आणि ६४-रंगी ॲम्बियंट लाइटिंग देखील दिले आहेत. सुरक्षेच्या बाबतीत, यात सहा एअरबॅग्ज (मानक म्हणून), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ३६० -डिग्री कॅमेरा, फ्रंट, साइड आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि लेव्हल-२ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आहेत.

किआ सायरोस पॉवरट्रेन
किया सायरोसमध्ये १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल जे ११८ बीएचपी पॉवर आणि १७२ एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून केलेलं आहे. यात १.५-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील असेल जो ११३ एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क निर्माण करतो. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड एमटी, ७-स्पीड डीसीटी आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे.

किआ सायरोस प्रकारानुसार किंमती
किया सायरोसमध्ये दोन इंजिन प्रकार आहेत. स्मार्टस्ट्रीम G१.० T-GDi आणि १.५L CRDi VGT. सर्व प्रकारांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. किया सायरोस स्मार्टस्ट्रीम G१.० T-GDi मध्ये ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये चार प्रकार आहेत, HTK- ८.९९ लाख रुपये, HTK (o)- ९.९९ लाख रुपये, HTK+ - ११.४९ लाख रुपये, HTX-१३.२९ लाख रुपये. ७७-स्पीडDCT प्रकारात HTK+ - १२.७९ रुपये, HTX - १४.५९ रुपये, HTX + - १५.९९ रुपये आहेत.

१.५ लिटर CRDi VGT इंजिन व्हेरिएंटमध्ये ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तीन व्हेरिएंट आहेत - HTK (o)- १०.९९ लाख रुपये, HTK +- १२.४९ लाख रुपये, HTX - १४.२९ रुपये. ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये एकच व्हेरिएंट आहे, तो म्हणजे HTX + - १६.९९ लाख रुपये.

किआ सायरोस प्रतिस्पर्धी
किआ सायरोस महिंद्रा XUV ३XO, टाटा नेक्सन, स्कोडा किलाक, किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती ब्रेझा सारख्या कारला टक्कर देते, तर किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि ह्युंदाई क्रेटाचा परवडणारा पर्याय म्हणून या करला तुम्ही खरेदी करू शकता.

हे वाचलंत का :

  1. ओलानं 320 किमी रेंजसह जेन 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लाँच, किंमत, वैशिष्ट्ये, श्रेणी, इतर तपशील जाणून घ्या...
  2. हत्तीचं बळ असणारा 'महिंद्रा वीरो' सीएनजी लॉंच, १.४ टन लोड घेण्याची क्षमता
  3. Tata Curvv EV Vs Mahindra BE 6 : कोणती कार आहे सर्वात बेस्ट?, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींचं संपूर्ण विश्लेषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.