वॉशिंग्टन : गुगलनं गुरुवारी सर्च लॅबद्वारे एक नवीन प्रायोगिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वैशिष्ट्य लॉंच केलं. आस्क फॉर मी असं या फीचरचं नाव आहे. हे वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य सध्या अमेरिकेतील निवडक वापरकर्त्यांसाठी गुगल सर्च ॲपच्या अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या वैशिष्ट्याचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना गुगलच्या सर्च लॅबमध्ये साइन अप करावं लागेल. त्यानंचर फीचर सक्रिय करावे लागेल. सध्या गुगलच्या सर्च लॅब्सचा भाग म्हणून उपलब्ध असलेले हे प्रायोगिक फीचर वापरकर्त्यांना फोन नंबर डायल न करता किंमत आणि उपलब्धता यासारखी आवश्यक माहिती ऍक्सेस करण्याची परवानगी देतंय.
New experiment just launched on Search Labs – you can use AI to call businesses on your behalf to find out what they charge for a service & when it’s available, like an oil change ASAP from nearby mechanics. https://t.co/9rKiRXiXZV
— Rose Yao (@dozenrose) January 30, 2025
सर्च लॅब वैशिष्ट्याची घोषणा
याबाबत एक्सवर (ट्विटर) एका पोस्टमध्ये, गुगलच्या उत्पादन व्यवस्थापनाचं उपाध्यक्ष रोझ याओ यांनी नवीन सर्च लॅब वैशिष्ट्याची घोषणा केली. नवीन एआय-संचालित वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये उपलब्ध असेल. विशिष्ट प्रश्नांसाठी व्यवसायांना कॉल करण्यासाठी तुम्ही एआयला सूचित करू शकता, असं त्यांनी लिहलं आहे. एकदा सक्रिय झाल्यानंतर, हे वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये स्वयंचलितपणे सुरू होईल. सध्या, ते फक्त नेल सलून आणि ऑटो रिपेअर शॉप्सना समर्थन देतंय.
फीचरची चाचणी सुरू
सुरुवातीच्या टप्प्यात, ऑटो शॉप्स आणि नेल सलूनमध्ये या फीचरची चाचणी घेतली जात आहे, भविष्यात या फाचरचा आणखी विस्तार करण्याची गुगलची योजना आहे. आस्क फॉर मी सुरू करण्यासाठी, वापरकर्त्यांना सर्च लॅब्समध्ये निवड करावी लागेल, आणि "माझ्या जवळील ऑटो शॉप्स" किंवा "माझ्या जवळील सलून" सारखी माहिती शोधावी लागेल. त्यानंतर, एआय कॉल करेल आणि आवश्यक माहिती मिळवेल. मात्र, या फीचरमध्ये वापरकर्त्यांना कॉल करण्यापूर्वी प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागू शकतो.
अचूक तपशील मिळवणं सोपं
गुगलनं म्हटलं आहे की, हे तंत्रज्ञान गुगल सर्च आणि गुगल मॅप्सद्वारे रेस्टॉरंट आरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीसारखंच आहे. लोक व्यवसायांशी कसं संवाद साधतात हे लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी या वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे, ज्यामुळं स्वतः फोन कॉलमध्ये सहभागी न होता जलद, अचूक तपशील मिळवणं सोपं होतं.
हे वाचलंत का :