नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2025-26 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करीत आहेत. अर्थमंत्र्यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. शेतीसाठी सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्यात. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री धन धान्य योजना राज्यांच्या सहकार्याने पुढे नेली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. बिहारमध्ये शेतकऱ्यांसाठी मखाना बोर्ड स्थापन केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय.
मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा : भारताला लवकरच अन्नधान्याचे भांडार बनवले जाणार असून, शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केलीय. मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन केले जाईल. या कामात सहभाग घेतलेल्यांना एफपीओ म्हणून संघटित केले जाणार आहे. भारताला अन्नधान्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढवला जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केलीय.
देशातील तरुणांसाठी रोजगार निर्माण होणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “युरिया उत्पादनात स्वयंपूर्णतेसाठी आमच्या सरकारने पूर्वेकडील प्रदेशातील 3 बंद पडलेले युरिया प्लांट पुन्हा सुरू केलेत. आसाममधील नामरूप येथील 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमता असलेला एक प्लांट युरिया पुरवठा वाढवण्यासाठी पुन्हा सुरू करण्यात आलाय. तसेच "एमएसएमईच्या सर्व वर्गीकरणांसाठी गुंतवणूक आणि उलाढालीची मर्यादा अनुक्रमे 2.5 आणि 2 पट वाढवली जाणार आहे. यामुळे त्यांना पुढे जाण्याचा आणि देशातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळेल." तसेच किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज सुविधा प्रदान करते. सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) द्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाणार आहे.
हेही वाचाः
निर्मला सीतारामन यांनी 'त्या' व्यक्तीच्या आग्रहाखातर नेसली मधुबनी साडी
अर्थसंकल्पात 'आरोग्य कर' लागू होण्याची शक्यता; जाणून घ्या कारण