मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज शनिवारी लोकसभेत सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, आज शेअर बाजार स्थिर पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ७७,७०० वर पोहोचला. निफ्टी ५० निर्देशांक आता ५३,५५० वर व्यवहार करत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
शुक्रवार बाजार
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद झाला. बीएसईवरील सेन्सेक्स ८०८ अंकांच्या वाढीसह ७७,५६५.७९ वर बंद झाला. त्याच वेळी, एनएसईवरील निफ्टी १.२२ टक्क्यांच्या वाढीसह २३,५३२.०५ वर बंद झाला. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी विविध क्षेत्रांमध्ये खरेदीमुळं ३१ जानेवारी रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सलग चौथ्या सत्रात वाढीसह बंद झाले. निफ्टी २३,५०० च्या वर बंद झाला.
ट्रेडिंग दरम्यान, टाटा कंझ्युमर, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, नेस्ले इंडिया, एल अँड टी यांचे शेअर्स निफ्टीवरील टॉप गेनरच्या यादीत समाविष्ट होते. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स टॉप लॉसर्सच्या यादीत समाविष्ट होते. ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, वीज, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, रिअल्टी, एफएमसीजी निर्देशांक २-२ टक्क्यांनी वधारले, तर भांडवली वस्तू निर्देशांक ४ टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक वाढले.
हे वाचलतं का :