महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

iQOO Neo10 आणि Neo10 Pro स्मार्टफोन लाँच, बेस मॉडेलमध्ये क्वालकॉम प्रोसेसर - IQOO NEO 10 PRO LAUNCHED

iQOO Neo10 आणि Neo10 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत. iQOO Neo10 सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये क्वालकॉम प्रोसेसर आहे. तर टॉप मॉडेल मीडियाटेक चिपसेटनं सुसज्ज आहे.

iQOO Neo10 and Neo10 Pro Smartphone
iQOO Neo10 आणि Neo10 Pro स्मार्टफोन (iQOO)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 30, 2024, 8:00 AM IST

हैदराबाद :iQOO Neo10 आणि Neo10 Pro फोन लॉंच केले आहे. दोन्ही फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनला समर्थन देणारा 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आहे. प्रो मॉडेल मीडियाटेक प्रोसेसरनं सुसज्ज आहे, तर बेस व्हेरियंटमध्ये क्वालकॉम प्रोसेसर आहे. सध्या हे दोन्ही फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत, मात्र ते लवकरच भारत होतील. कंपनीनं यात स्वतः विकसित केलेली Q2 चिप बसवली आहे. या दोन्ही फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

प्रोसेसर : Neo10 मध्ये Snapdragon 8 Gen 3 SoC प्रोसेसर आहे असून Neo10 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 SoC प्रोसेसर आहे. जो AnTuTu वर 3.2 दशलक्ष स्कोअर करतो. यात Q2 स्वयं-विकसित चिप आहे. यात 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज आहे. या फोनमध्ये 6.4K कॅनोपी व्हीसी लिक्विड कूलिंगची सुविधा आहे, ज्यामुळे फोन जास्त गरम होत नाहीय.

सेल्फी कॅमेरा : Neo10 मालिकेत OIS सह Sony IMX921 VCS सेन्सर आहे. Neo10 Pro मध्ये 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. टॉप मॉडेलमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी दोघांमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट : फोनमध्ये 6100mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 15 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. त्यात iQOO 13 प्रमाणे 100W PPS प्रोटोकॉल सपोर्ट देखील आहे.

iQOO Neo10 आणि Neo10 Pro तपशील :

  • यात 6.78-इंच (2800×1260 पिक्सेल) मिळतोय.
  • 1.5K 8T LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो HDR10+ सह 4500 nits पीक ब्राइटनेस, 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • Neo10 मध्ये Adreno 750 GPU सह ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 4nm प्रोसेसर आहे.
  • Neo10 Pro मध्ये Immortalis-G925 GPU सह octa-core Dimensity 9400 3nm SoC वैशिष्ट्ये
  • 12GB RAM/16GB LPDDR5X रॅम
  • 256GB/512GB/1TB (UFS 4.1) स्टोरेज
  • OriginOS 5.0 सह Android 15
  • 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर
  • यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, हाय-फाय ऑडिओ
  • 120W अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंगसह 6100mAh बॅटरी

ABOUT THE AUTHOR

...view details