हैदराबाद : वनप्लस वॉच 3 मंगळवारी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली. ही वाच फेब्रुवारी 2024 मध्ये सादर केलेल्या वनप्लस वॉच 2 वैशिष्ट्यांवर आधारित आहे. चीन आधारित OEM कडून नवीन फ्लॅगशिप स्मार्टवॉच 1.5 इंचाच्या LTPO स्क्रीनसह येते. त्यात नवीन टायटॅनियम अलॉय बेझल देखील आहेत. वनप्लस वॉच 3 60 सेकंदात जलद आरोग्य तपासणी करू शकते. एका वेळी चार्ज केल्यावर वॉचची चार्जिंग 5 दिवसांपर्यंत टिकू शकते, असा कंपनीनं दावा केलाय. तसंच पॉवर सेव्ह मोडमध्ये 16 दिवसांपर्यंत टिकू शकते.
Meet the #OnePlusWatch3! ⌚ Our most powerful smartwatch yet. Powered with Wear OS by Google!
— OnePlus_USA (@OnePlus_USA) February 18, 2025
- Up to 120H of battery life in Smart Mode
- Durability with a titanium bezel
- Advanced health tracking
Endurance & precision—reimagined on your wrist.
वनप्लस वॉच 3 ची किंमत
अमेरिकेत 329$ (अंदाजे 28, 583.37) आहे. कंपनी सध्या वॉच खरेदीवर 30$ (अंदाजे 2,606.74 रुपये) ची सूट देत आहे. खरेदीदारांना त्यांच्या जुन्या स्मार्टवॉचवर अतिरिक्त 50$ (अंदाजे 4,343.55 रुपये) सूट देखील मिळू शकते. सध्या वॉच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. तिची डिलिव्हरी 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. ही स्मार्टवॉच दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात एमराल्ड टायटॅनियम आणि ऑब्सिडियन टायटॅनियम रंगाचा समावेश आहे.
वनप्लस वॉच 3 स्पेसिफिकेशन
वनप्लस वॉच 3 मध्ये 1.5 इंच (460x460 पिक्सेल) LTPO AMOLED स्क्रीन आहे, ज्याचा पीक ब्राइटनेस 2,200 निट्स आहे. त्यात नीलमणी क्रिस्टल ग्लास कव्हर आणि वाढीव संरक्षणासाठी टायटॅनियम अलॉय बेझल्स आहेत. ही स्मार्टवॉच MIL-STD-810H प्रमाणित आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रवेशापासून बचावासाठी वॉचला Ian P68 रेटिंग मिळालं आहे. वॉच 5ATM च्या खोलीपर्यंत पाण्यात राहू शकते.
- वनप्लसचे नवीनतम घड्याळ स्नॅपड्रॅगन W5 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये BES2800BP MCU सह हायब्रिड आर्किटेक्चर आहे. त्याला 32GB ऑनबोर्ड मेमरी मिळते. ती Google च्या Wear OS 5 आणि रिअल-टाइम ऑपरेटिंग सिस्टम (RTOS) वर चालते. आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी, OnePlus Watch 3 मध्ये मनगटाचे तापमान सेन्सर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ऑप्टिकल पल्स ऑक्सिमीटर सेन्सर आहे. मन, शरीर, रक्त ऑक्सिजन, झोप, मनगटाचे तापमान आणि रक्तवहिन्यासंबंधी आरोग्याचं निरीक्षण करण्यास वॉच समर्थन देते.
- यात eHealth ॲपमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळवू शकते. तसंच Google Health Connect सेवा, Strava आणि आरोग्य विषयक वैशिष्ट्याचा वापर करता येतो. OnePlus घड्याळ 10 स्पोर्ट (क्रिडा) मोडसह 100+ स्पोर्ट्स मोडसाठी समर्थन देते. स्मार्टवॉचवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड L1+L5, Beidou, GPS, Galileo, GLONASS आणि QZSS यांचा समावेश आहे. त्यात ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC आणि ब्लूटूथ कॉलिंग देखील आहे. वापरकर्ते Google Wallet वापरून OnePlus Watch 3 सह मोबाइल पेमेंट करू शकतात, असा दावा कंपनीनं केलाय.
हे वाचलंत का :