ETV Bharat / entertainment

'छावा'ची दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते : टॉलिवूड प्रेक्षकांची साऊथच्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी, निर्माते घेणार का मोठा निर्णय? - CHHAWA SUCCESS IN SOUTH INDIA

विकी कौशल स्टारर 'छावा' हा चित्रपट देशभरात लोकप्रिय झाला आहे. आता सोशल मीडियावर हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी सुरू झाली आहे.

Chhava in Telugu
'छावा'ची दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते (Movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 19, 2025, 5:40 PM IST

मुंबई : विकी कौशल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्य 'छावा' या ऐतिहासिक काळातील नाट्यमय चित्रपटानं प्रेक्षकांमध्ये खूप प्रेम मिळवलंय. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलनं प्रे7कांची मनं जिंकलेत. 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि देशभरात लोकप्रिय झाला आहे. आता, सोशल मीडियावर 'छावा'च्या तेलुगू आवृत्तीची मागणी सुरू झाली आहे.

'छावा' या चित्रपटाच्या तेलुगू डबिंगची मागणी वाढली - 'छावा'च्या तेलुगू भाषेतील आवृत्तीची एक्स हँडलवर वेगानं मागणी येत आहे. काही लोकांनी 'छावा'च्या निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात इंग्रजी सबटायटल्स जोडण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी, छावा हा चित्रपट केवळ हिंदी प्रेक्षकांपुरता मर्यादित ठेवल्याबद्दल अनेकांनी निर्मात्यांना फटकारलं आहे. 'छावा' वर एका युजरनं लिहिलं की, 'कृपया 'छावा' हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित करा, मी तो हिंदी सबटायटल्समध्ये पाहिला पण काहीही समजलं नाही'. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, 'कृपया शिवाजी आणि संभाजी महाराजांचा वारसा आणि शौर्य फक्त हिंदी भाषेपुरतं मर्यादित ठेवू नका, ते तेलुगूमध्येही प्रदर्शित करा, प्रत्येक भारतीयानं ही कथा पाहावी.' एका युजरनं छावा, मडॉक फिल्म्सच्या निर्मात्यांना 'छावा' हा चित्रपट लवकरात लवकर तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे.

लोकांनी 'छावा'च्या निर्मात्यांवर सोडले टीकास्त्र - एका युजरनं लिहिलं की, 'छावा'च्या निर्मात्यांचा सर्वात वाईट निर्णय म्हणजे त्यांनी चित्रपट फक्त हिंदीमध्ये प्रदर्शित केला, हा चित्रपट तेलुगूमध्ये सहजपणे ५० ते ८० कोटींचा व्यवसाय करू शकतो.' दुसऱ्या एका युजरनं लिहिले की, 'एवढ्या उत्तम चित्रपटाला दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही हे खूप आश्चर्यकारक आहे, हा चित्रपट लवकरात लवकर दक्षिणेकडील राज्यांमध्ये डब करून दाखवला पाहिजे.' आता 'छावा'च्या निर्मात्यांना तेलुगू भाषेत चित्रपट प्रदर्शित करून मोठे यश मिळवण्याची मोठी संधी आहे. अशा परिस्थितीत, निर्माते यावर कधी निर्णय घेतात हे पाहणे बाकी आहे. 'छावा' चित्रपटानं पाच दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.