बर्धमान Sourav Ganguly Car Accident : भारताच्या महान क्रिकेट कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीच्या ताफ्याचा गुरुवारी अपघात झाला. तो बर्धमान इथं एका कार्यक्रमात सहभागी होणार होता.
कसा झाला अपघात : मीडिया रिपोर्ट्सनुसार सौरव गांगुलीची गाडी दुर्गापूर एक्सप्रेसवेवरुन जात असताना हा अपघात झाला. यादरम्यान, सिंगूरजवळ अचानक एका भरधाव ट्रकनं सौरवच्या कारला धडक दिली. तेवढ्यात सौरव गांगुलीच्या गाडीच्या चालकानं गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक लावला. मग अचानक ताफ्यातील सर्व वाहने एकामागून एक सौरव गांगुलीच्या गाडीवर आदळली. मात्र, या भीषण अपघातात सौरव थोडक्यात बचावला. ताफ्यातील वाहनांचं नुकसान झालं आहे. काही वेळ रस्त्यावर वाट पाहिल्यानंतर, गांगुली बर्धमान समारंभासाठी निघून गेला.
Sourav Ganguly was in a minor car accident on the Durgapur Expressway while on his way to Bardhaman. The accident happened when a lorry attempted to merge into his convoy. pic.twitter.com/mD7uo9OumS
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) February 21, 2025
सौरव बर्धमान विद्यापीठात जात होता : या अपघातात सौरव गांगुलीच्या गाडीलाही मागून धडक बसली, पण दिलासा म्हणजे कोणीही जखमी झालं नाही. मात्र ताफ्यातील दोन वाहनांचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर, सौरव गांगुली सुमारे 10 मिनिटे रस्त्यावरच राहिला. यानंतर तो बर्धमान विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघून गेला. या अपघातात सौरव थोडक्यात बचावला आणि मोठी दुर्घटना टळली.
भारताचा आक्रमक कर्णधार : सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक कॅप्टन म्हणून ओळखला जातो. गांगुलीच्या कार्यकाळात भारतानं विदेशात मोठ्या संख्येनं सामने जिंकण्यास सुरुवात केली. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. सौरव गांगुलीनं वनडे क्रिकेटमध्ये 11363 धावा केल्या. वनडेमध्ये त्याच्या नावावर 22 शतकं आणि 52 अर्थशतकं आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वात भारतानं वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली होती. तर, त्यानं काही काळ बीसीसीआयचा चेअरमन म्हणूनही काम केलं आहे.
हेही वाचा :