ETV Bharat / technology

होंडा हॉर्नेट 2.0 ची अपडेट आवृत्तीमध्ये लॉंच, हॉर्नेट 2.0 चार रंगांत उपलब्ध - NEW UPDATED HONDA HORNET

होंडा हॉर्नेट 2.0 2025 ची अपडेट आवृत्तीमध्ये लॉंच झालीय. या दुचाकीत डिझाइनसह विविध फीचर देण्यात आले आहेत.

Honda Hornet 2.0
होंडा हॉर्नेट 2.0 (Honda)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 19, 2025, 5:08 PM IST

हैदराबाद : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं अपडेटेड OBD2B अनुरूप हॉर्नेट 2.0 मोटरसायकल लाँच केली आहे. या दुचाकीची किंमत 1.5 लाख रुपयांपेक्षा (एक्स-शोरूम) जास्त आहे.

2025 होंडा हॉर्नेट 2.0

हॉर्नेट 2.0 मध्ये 184.40 सीसी सिंगल-सिलेंडर, 4 स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 8,500 आरपीएम वर 16.76 बीएचपी पॉवर आउटपुट देतं आणि 6,000 आरपीएम वर 15.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. ही दुचाकी असिस्ट आणि स्लिपर क्लचनं सुसज्ज आहे. अपडेटेड हॉर्नेट 2.0 मध्ये बॉडी पॅनल्सवर आकर्षक नवीन ग्राफिक्स देण्यात आलं आहे. ज्यामुळं दुचाकीचा बोल्ड लूक आणखी छान दिसतो. दुचाकी एलईडी लाइटिंग सिस्टमनं सुसज्ज आहे.

होंडा हॉर्नेट 2.0 चार रंगांत उपलब्ध
2025 होंडा हॉर्नेट 2.0 चार रंगांत उपलब्ध आहे. ज्यामध्ये पर्ल इग्नियस ब्लॅक, रेडियंट रेड मेटॅलिक, अ‍ॅथलेटिक ब्लू मेटॅलिक आणि मॅट अ‍ॅक्सिस ग्रे मेटॅलिक रंगाचा समावेश आहे.

2025 होंडा हॉर्नेट 2.0 वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल तर,2025 होंडा हॉर्नेट 2.0 मध्ये पूर्णपणे एलईडी लाइटिंग, मोबाइल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट आणि होंडा रोडसिंक ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 4.2-इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. जे रायडर्सना नेव्हिगेशन सपोर्ट, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स देते.

अपडेटेड हॉर्नेट 2.0 सादर करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ, व्यवस्थापकीय संचालक, त्सुत्सुमु ओटानी म्हणाले, “ऑगस्ट 2020 मध्ये पहिल्यांदा सादर केल्यापासून, हॉर्नेट 2.0 या सेगमेंटमध्ये एक गेम-चेंजर ठरली आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही मोटरसायकलला सतत अपडेट करत आहोत. नवीन ओबीडी2 बी-अनुरूप हॉर्नेट 2.0 सह, आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा वैशिष्ट्यांसह ग्राहकांना अधिक चांगला रायडिंग अनुभव देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.”

हे वाचंलत का :

  1. 2025ची टीव्हीएस रोनिन 1.35 लाख रुपयांना लाँच, बाईकमध्ये काय झाले बदल?
  2. रेनॉल्ट इंडियानं प्रगत वैशिष्ट्यांसह कायगर आणि ट्रायबरचं अपग्रेड्स मॉडेल केलं लाँच
  3. नवीन सुरक्षा वैशिष्ट्यासह बजाज पल्सर एनएस 125 एबीएस लाँच, काय आहे किंमत?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.