ETV Bharat / state

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप - SHIVJAYANTI 2025

'हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा' प्रमाण मानून रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाच्या व्यक्तिमत्वाचे अद्वितीय पैलू जाणून घ्या.

SHIVJAYANTI 2025
छत्रपती शिवाजी महाराज (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2025, 6:31 PM IST

Updated : Feb 20, 2025, 1:04 PM IST

हैदराबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अनेक पोवाडे ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे करतात. त्यांच्या कर्तबगारीचे, विद्वत्तेचे अनेक प्रसंग आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करुन देतात. अफझलखानाचा कोथळा काढणारे, शाहिस्तेखानाची बोटं छाटणारे, मुघल बादशाह औरंगजेबाला भर दरबारात सुनावणाऱ्या शिवरायांची प्रत्येक कृती त्यांच्यातल्या दिव्यत्वाची प्रचिती आणून देते. या पलीकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्यत्वावर चर्चा होत राहणं महत्त्वाचं आहे.

अर्थविषयक जाणकार शिवराय : १६ व्या शतकात दैनंदिन वापरासाठी फारसी दक्खनी भाषेचा वापर होत असे. पण शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर स्वराज्यामध्ये दैनंदिन आणि स्वराज्याच्या वापरासाठी मराठी राज व्यवहार कोषाची निर्मिती केली. आर्थिक सुबत्तेबरोबरच भविष्यातल्या संभाव्य वित्तीय अडचणींवर मात करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुशल 'अर्थतज्ज्ञ' ठरतात.

आरमाराचे जनक : छत्रपती शिवाजी महाराजांना 'भारतीय आरमाराचे जनक' मानलं जातं. पाण्यातून होणाऱ्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग अशा सागरी किल्ल्यांची निर्मिती केली. भविष्यात इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि डच यांसारखे शत्रू जलमार्गामार्फत स्वराज्यावर हल्ला करु शकतात, याचा अंदाज आल्यानंतर त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं स्वतंत्र आरमार उभं केलं. प्राचीन काळात चोल राजांनी आरमार उभारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना मर्यादा होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आरमाराचं महत्त्व हे मोठंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे 'आरमाराचे जनक' ठरतात.

सोशल इंजिनियरिंगचे अध्वर्यु : छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना हाती धरून सर्व जातींमध्ये सलोखा राखत लोक कल्याणासाठी राज्य उभारलं. सर्व जातींना हिंदवी स्वराज्याच्या ध्वजाखाली एकत्र आणत 'मराठा तितुका मेळवावा' चा संदेश देणारी तसंच भारतातील सोशल इंजिनियरिंग सांभाळणारी ही एकमेव राज्यव्यवस्था असावी.

जमिनीचं मोजमाप करणारा पहिला राजा : तलवार, दांडपट्टा कुशलतेने हाताळणारे शिवराय आपल्या राज्यातल्या भूमीचं अचूक मोजमाप करणारे पहिले राजे असावेत. जमीन मोजण्यासाठी त्याकाळी एका विशिष्ट काठीचा वापर केला जात असे. पाच हात लांब आणि पाच मुठीची काठी अशी ती काठी होती. असे हात आणि मुठी मिळून ब्याऐंशी तसुंची लांबी असलेली एक काठी असायची. अशा वीस काठ्या औरस-चौरस ठेऊन एक बिघा तयार व्हायचा. असे वीस बिघा मिळून एक चावर व्हायचा. अशाप्रमाणे सुरवणिस अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्यातील जमिनीची मोजणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जमीन मोजणीची पद्धत सुरू केली. यासह त्यांनी जमीनीची मोजणी करत त्याची प्रतवारी ठरवली.

SHIVJAYANTI 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र (चित्रकार- उर्वी परब)

महिलांचा आदर : राजदरबार म्हटला म्हणजे गीत - नृत्य हवीतच, मद्याचे प्याले रिचवले जायला हवेतच, असा सर्वसाधारण समज असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार मात्र याला सणसणीत अपवाद होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीही नृत्याचे कार्यक्रम झाले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा आदर करत. आपल्या मोहिमेच्या दरम्यान शत्रूच्या परिसरातील महिलांना त्रास द्यायचा नाही, असा आदेश त्यांनी आपल्या मावळ्यांना देऊन ठेवला होता. आदेशाची जराही अवहेलना झाली की ते अपराध्याच्या पदाचा मुलाहिजा न बाळगता कठोर शासन करत.

स्त्री स्वातंत्र्याचे कर्ते सुधारक : छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील 'स्वराज्यसंकल्पक' शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर शिवबाच्या लाडक्या मॉंसाहेब त्याकाळातल्या प्रथेनुसार सती जाणार होत्या. मात्र शिवरायांनी हे अघटित होऊ दिलं नाही. त्यांनी जिजाऊंना सती जाण्याच्या निर्णयापासून परावृत्त केलं. जिजाऊंनी स्वराज्याची गरज ओळखत आणि इतर महिलांसमोर आदर्श उभा करत सती जाण्याचा निर्णय बदलला. हे त्या काळातलं क्रांतीकारक पाऊल होतं.

कुशल अभियंता : गड आणि किल्ले म्हणजे स्वराज्याचं वैभव! आज एकविसाव्या शतकात राज्याचा किंवा देशाचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरवताना किती विलंब लागतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. सोळाव्या शतकात यंत्रसामुग्री, दळणवळणाची अत्यल्प साधनं असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तमोत्तम भूईकोट किल्ले उभारले, जुन्या किल्ल्यांच्या तटबंदी मजबूत केल्या. त्यांनी उभारलेले भुईकोट किल्ले आणि जलदुर्ग आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'कुशल अभियंता' असण्याची साक्ष पटवतात. एखादा किल्ला बांधताना त्याची रचना कशी असावी यातून छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापत्यामधील दूरदृष्टी आपल्याला दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यशैलीचं विशेष म्हणजे त्यांनी जे काही किल्ले बांधलेत किंवा ज्यांची दुरुस्ती केली, त्यांना एक महाद्वार असे. त्याला 'गोपूर' म्हणतात. हे महाद्वार शत्रूच्या सहज दृष्टीत येत नसे. यदा कदाचित शत्रूचं सैन्य किल्ल्यात शिरलं, तर किल्ल्यामध्ये आठ ते दहा चोर वाटा असत. त्यातून महाराजांच्या सैन्याला सहज बाहेर पडता येत होतं. अशी व्यवस्था देवगिरीच्या किल्ल्याला नव्हती. महाराजांच्या किल्ल्यांचं मात्र कधीही पतन होऊ शकलं नाही. या चोरवाटेतूनच महाराजांचे पुत्र राजाराम हे सिंहगडाच्या माध्यमातून जिंजीला गेले आणि तिथून त्यांनी राज्यकारभार केला.

राष्ट्रापेक्षा मोठं काही नाही : त्याकाळी रूढी, परंपरेनुसार समुद्र प्रवास निषिद्ध होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. स्वराज्य विस्तार, स्थानिकांना रोजगार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण अशी मुख्य कारणे आरमाराच्या निर्मिती मागे होती. धर्माचं पालन करताना त्याचा राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अडथळा येणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली.

अंधश्रद्धेला खपपाणी नाही : अमावस्येच्या दिवशी शुभ काम करू नये, असं आजही म्हणतात. मात्र शिवरायांनी आपल्या अनेक मोहिमा अमावस्येच्या दिवशी सुरू केल्या आणि यशस्वीही करून दाखवल्या. अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांना शिवरायांच्या सुधारणावादाने दिलेली ही चपराक म्हणायला हवी.

हेही वाचा :

  1. छत्रपती घराण्याच्या वतीनं शाही लवाजम्यासह शिवजयंती साजरी; शाहू महाराजांनी केलं सरकारच्या कारवाईचं कौतुक
  2. पुण्यात अवतरली शिवशाही : शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 : अद्भुत स्थापत्य, अभेद्य राज्य; छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढं शत्रू हतबल

Last Updated : Feb 20, 2025, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.