नागपूर VID vs MUM 2nd Semifinal : रणजी ट्रॉफी एलिट 2024-25 चा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि मुंबई क्रिकेट संघात नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात विदर्भानं 80 धावांनी विजय मिळवला आहे. आता रणजीचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळवला जाईल.
WICKET! Over: 97.5 Mohit Avasthi 34(43) lbw Harsh Dubey, Mumbai 325/10 #VIDvMUM #RanjiTrophy #Elite-SF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2025
विदर्भानं घेतला पराभवाचा बदला : मागील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना देखील विदर्भ आणि मुंबई यांच्यात खेळला गेला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईनं त्या सामन्यात 169 धावांनी शानदार विजय मिळवला होता. विदर्भाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 538 धावांची आवश्यकता होती. याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरनं शतक झळकावलं तर, हर्ष दुबेनं 65 धावा केल्या होत्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नव्हते. परिणामी मुंबईनं 42व्यांदा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकला होता. आता मात्र विदर्भानं या सामन्यात विजय मिळवत आपल्या मागिल पराभवाचा बदला घेतला आहे.
सकाळच्या सत्रात मुंबईला दोन धक्के : विक्रमी 42 वेळा रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला हा सामना जिंकत अंतिम फेरीत जाण्यासाठी आज सामन्याच्या पाचव्या दिवशी 323 धावांची आवश्याकता होती. मात्र त्यांची दिवसाची सुरुवात खराब झाली. आजचा खेळ सुरु झाल्यावर मुंबईला चौथ्याच षटकात धक्का बसला. शिवम दुबे 12 धावां करुन यश ठाकुरचा बळी ठरला. तसंच त्यानंतर 42व्या षटकात सूर्या देखील स्वस्तात बाद झाला. यानंतर एका टोकाला उभा असलेला आकाश आनंद देखील 39 धावांवर बाद झाला. यानंतर शार्दुल ठाकुर (66) आणि शम्स मुलाणी (46) यांनी शतकी भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणलं मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. यानंतर शेवटच्या विकेटसाठी सुद्धा मोहित अवस्थी (34) आणि रॉयस्टन डायस (23) यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, विदर्भाकडून हर्ष दुबेनं सर्वाधिक 5 बळी घेतले.
Vidarbha Won by 80 Run(s) (Qualified) #VIDvMUM #RanjiTrophy #Elite-SF2 Scorecard:https://t.co/OLdCTWx00s
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
विदर्भ : अथर्व तायडे, ध्रुव शोरे, पार्थ रेखाडे, दानिश मालेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हर्ष दुबे, दर्शन नालकांडे, यश ठाकूर, नचिकेत भुते.
मुंबई : आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुश कोटियन, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस.
हेही वाचा :