हैदराबाद : या वर्षीच्या ग्लोबल एक्स्पोमध्ये टाटा सिएरा सादर करण्यात आली होती. ताज्या बातम्यांनुसार, ही कार चाचणी दरम्यान दिसली आहे. जी लवकरच भारतात लाँच केली जाईल. ही बॉक्सी डिझाइन असलेली एसयूव्ही असेल. सिएरा ईव्ही, पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये लाँच केली जाईल. तसंच, ही कार टाटाच्या जेन2 ईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन सिएरामध्ये कोणती खास वैशिष्ट्ये दिसतील? तिची किंमत किती असेल? चला जाणून घेऊया सविस्तर या बातमीतून...
नवीन टाटा सिएरा कधी होणार लाँच?
नवीन टाटा सिएरा या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, नवीन सिएरामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिसतील. यामध्ये प्रीमियम साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल.
नवीन टाटा सिएरा सुरक्षा वैशिष्ट्ये
सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर, यात 6 एअरबॅग्ज, 360 -डिग्री कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि लेव्हल 2 ADAS सारखी वैशिष्ट्ये असतील. तसंच, त्याच्या इंटीरियरमध्ये 3 स्क्रीन असतील. त्यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल टचस्क्रीन, एन आणि पॅसेंजर-साइड टचस्क्रीन, 12.3 -इंच स्क्रीन देखील असेल.
पेट्रोल, डिझेल, आणि ईव्हीमध्ये सिएरा होणार लाँच
नवीन टाटा सिएरामध्ये 1.5 -लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल जे 170 एचपी आणि 280 एनएम टॉर्क जनरेट करेल. याशिवाय, त्यात 2.0 -लिटर डिझेल इंजिनचा पर्याय देखील असेल, जो हॅरियर आणि सफारीमध्ये असलेलं इंजिन आहे. सिएरा 6 मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल. सिएरा ईव्हीमध्ये 60 -80 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक असेल जी 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. याशिवाय, ही एसयूव्ही AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) तंत्रज्ञानासह देखील उपलब्ध असेल. ही कार भारतात 10.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते.
हे वाचलंत का :