हैदराबाद : रेनॉल्ट इंडियानं त्यांच्या कायगर आणि ट्रायबर कारचं अपडेटेड मॉडेल नवीन वैशिष्ट्यांसह लाँच केलं आहेत. यावेळी कंपनीनं एसयूव्ही आणि एमपीव्हीमध्ये सुरक्षितता आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं आहे. या मॉडेल्सच्या सर्व प्रकारांमध्ये आता 17 मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तसंच, सर्व मॉडेल्समध्ये पॉवर विंडो आणि रिमोट सेंट्रल लॉकिंग उपलब्ध असेल. आरएक्सएल आणि उर्वरित प्रकारांमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसंच रीअरव्ह्यू कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये असतील. रेनॉल्ट इंडियानं त्यांच्या परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट सब-4 मीटर एसयूव्ही कायगरचा नवीन टर्बो पेट्रोल सीव्हीटी प्रकार देखील लाँच केला आहे, ज्याची किंमत 9.99 लाख रुपये आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
नवीन रेनॉल्ट ट्रायबरच्या किमती
रेनॉल्ट इंडियाच्या परवडणाऱ्या MPV ट्रायबरच्या मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शन RXE व्हेरिएंटची किंमत 6,09,995 रुपये, RXL व्हेरिएंटची किंमत 6,99,995 रुपये, RXT व्हेरिएंटची किंमत 7,70,995 रुपये आणि RXZ व्हेरिएंटची किंमत 8,88,995 रुपये आहे. ट्रायबरच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन RXZ व्हेरिएंटची किंमत 8,74,995 रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किमती आहेत.
नवीन रेनॉल्ट कायगरच्या किमती
रेनॉल्ट RXE व्हेरिएंटची किंमत 6,09,995 रुपये, RXL व्हेरिएंटची किंमत 6,84,995 रुपये, RXT+ RXL व्हेरिएंटची किंमत 7,99,995 रुपये आणि RXZ व्हेरिएंटची किंमत 8,79,995 रुपये आहे. एनर्जी एएमटी आरएक्सएलची किंमत 7,34,995 रुपये, आरएक्सटी+ ची किंमत 8,49,995 रुपये, टर्बो मॅन्युअल आरएक्सझेडची किंमत 9,99,995 रुपये, टर्बो सीव्हीटी आरएक्सटी प्लसची किंमत 9,99,995 रुपये आणि आरएक्सझेड व्हेरिएंटची किंमत 10,99,995 रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किमती आहेत. तसंच, अतिरिक्त 23,000 रुपये देऊन, तुम्ही निवडलेला व्हेरिएंट ड्युअल-टोन एक्सटीरियर बॉडी कलरमध्ये निवडू शकता.
विशेष काय आहे?
सर्व रेनॉल्ट मॉडेल्स आता ई-20 इंधनावर चालू शकतात. ई-20 इंधनात 20% इथेनॉल असतं, जे पर्यावरणासाठी चांगलं आहे. कंपनीच्या ह्यूमन फर्स्ट उपक्रमाचा भाग म्हणून, 2025 कायगर आणि ट्रायबर मॉडेल्सच्या सर्व प्रकारांमध्ये 17 सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन, ड्युअल एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
- रेनॉल्ट कायगरमध्ये अनेक नवीन अपडेट्स देण्यात आले आहेत. RXE व्हेरिएंटमध्ये आता चारही दरवाज्यांसाठी पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग मिळेल. RXL व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, रीअरव्ह्यू कॅमेरा आणि स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स मिळतील. RXT(O) व्हेरिएंटमध्ये फ्लेक्स व्हील्स आणि टर्बो इंजिनसह CVT ट्रान्समिशन मिळते. RXZ टर्बो व्हेरिएंटमध्ये स्मार्ट ॲक्सेस कार्ड आणि रिमोट इंजिन स्टार्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.
- रेनॉल्ट ट्रायबरमध्ये अनेक नवीन अपडेट्स मिळाले आहेत. RXE व्हेरिएंटमध्ये आता चारही दरवाज्यांसाठी पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग मिळते. RXL व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, रीअरव्ह्यू कॅमेरा, रीअर पॉवर विंडो आणि रीअर स्पीकर मिळतात. RXT व्हेरिएंटमध्ये 15-इंच फ्लेक्स व्हील्स मिळतील. या नवीन वैशिष्ट्यांसह, ट्रायबर आणखी आरामदायी आणि सोयीस्कर झाला आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर
रेनॉल्ट इंडियानं आपल्या ग्राहकांना अनेक नवीन ऑफर देखील दिल्या आहेत. यामध्ये 3 वर्षांची किंवा 1,00,000 किलोमीटरची मानक वॉरंटी आणि 7 वर्षांची किंवा अमर्यादित किलोमीटरची विस्तारित वॉरंटी समाविष्ट आहे. कंपनीनं अलीकडंच चेन्नईमध्ये त्यांचं नवीन 'न्यू आर स्टोअर' लाँच केले आहे, जे कंपनीच्या नवीन जागतिक नेटवर्क आर्किटेक्चरवर आधारित आहे.
हे वाचलंत का :