हैदराबाद : ओपनएआयच्या माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) मीरा मुराती यांनी 'थिंकिंग मशीन्स लॅब' नावाचा एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्टार्टअप सुरू केला आहे. या स्टार्टअपद्वारे, मुराती आणि त्यांची टीम एआय तंत्रज्ञानाला अधिक उपयुक्त बनवू इच्छितात. मुराती यांच्या कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ जॉन शुलमन आहेत, जे ओपनएआयचे सह-संस्थापक होते.
“थिंकिंग मशीन्स लॅब ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. आम्ही असं भविष्य घडवत आहोत जिथं प्रत्येकाला त्यांच्या अद्वितीय गरजा आणि उद्दिष्टांसाठी एआय काम करण्यासाठी ज्ञान आणि साधनं उपलब्ध असतील,” असं कंपनीच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. - थिंकिंग मशीन्स लॅब
थिंकिंग मशीन्स लॅब
मीरा मुराती यांची कंपनी अशा एआय सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, जे लोकांच्या गरजेनुसार काम करू शकतील. विज्ञान, प्रोग्रामिंग आणि इतर क्षेत्रात एआय उपयुक्त बनवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. मुराती एआयला अधिक सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करताय. याशिवाय, कंपनी मल्टीमॉडल सिस्टीम तयार करेल ज्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. कंपनी एआय सुरक्षित आणि नैतिक बनवण्यासाठी देखील प्रयत्न करेल, जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. मुरती यांनी यापूर्वी टेस्लामध्ये काम केलं आहे. तिथं त्यानी मॉडेल एक्स कार प्रकल्पावर काम केलं होतं. याव्यतिरिक्त, ओपनएआयमध्ये असताना त्यांनी चॅटजीपीटी, डीएएलएल-ई आणि कोडेक्स सारख्या एआय तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलीय. आता मुराती नवीन स्टार्टअपसाठी एआय क्षेत्रात काम करणारे मोठे तज्ञ आणि अभियंत्यांना एकत्र करण्यात व्यस्त आहे. कंपनी नवीन शोध आणि एआयमधील मोठ्या बदलांसाठी काम करत आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये दिला होता राजीनामा
सप्टेंबर 2024 मध्ये, मीरा मुराती यांनी अचानक ओपनएआयमधून राजीनामा दिला होता. “ओपनएआय टीमसोबतचा माझा साडेसहा वर्षांचा अनुभव हा एक असाधारण होता. आम्ही केवळ स्मार्ट मॉडेल्स तयार केलं नाहीत, तर एआय सिस्टम्स कसे शिकतं, समस्यांमधून ते कसे तर्क काढतं, हे आम्ही बदललं,” असं त्यांनी राजीनामा पत्रात लिहिलं होतं. आता, सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर, मुराती यांनी स्वतःचं एआय स्टार्टअप सुरू केलं आहे. हे एआय ओपनएआयशी स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :