हैदराबाद Google Pay gold loan :युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ॲप Google Pay च्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Google Pay वापरकर्ते ॲपद्वारे सोन्यासाठी कर्ज घेऊ शकतात. Google नं नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) मुथूट फायनान्सशी एक करार केला आहे, ज्या अंतर्गत Google Pay वापरकर्त्यांना सोन्याच्या बदल्यात कर्ज दिलं जाणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीनं एआय असिस्टंट जेमिनी लाइव्ह हिंदीमध्ये लॉंच करणार असल्याची घोषणा केलीय. त्यात आणखी आठ भारतीय भाषांची भर पडणार असल्याचं गुगलनं, एका निवेदनात म्हटलं आहे.
एआय जेमिनी हिंदीमध्ये : गुगल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक रोमा दत्ता चौबे यांनी सांगितलं की, जगातील सुमारे 11 टक्के सोनं भारतात आहे. भारतभरातील लोक आता परवडणाऱ्या व्याजदरांसह कर्जाचा लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, एआय असिस्टन्स जेमिनी लाइव्हबद्दल, गुगल इंडियाच्या उत्पादन व्यवस्थापनाच्या वरिष्ठ संचालक हेमा बुडाराजू यांनी सांगितलं की, वापरकर्त्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोक गुगल सर्चसाठी आवाजाचा वापर करताय.