हैदराबाद : iQOO नं अखेर iQOO Neo 10R स्मार्टफोनच्या लाँचची तारीख निश्चित केली आहे. पुढील निओ-ब्रँडेड स्मार्टफोन भारतात 11 मार्च रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे. Amazon वरील त्याच्या लँडिंग पेजवर फोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये समोर आली आहेत.
iQOO Neo 10R ११ मार्चला होणार लॉंच
टीझरनंतर, iQOO नं ११ मार्च रोजी भारतात Neo मालिकेतील कंपनीचा पुढील स्मार्टफोन Neo 10R लाँच होणार असल्याची पुष्टी केली आहे. हा फोन रॅगिंग ब्लू रंगात दिसतो, जो कंपनीने केवळ भारतासाठी बनवल्याचं म्हटलं आहे. फोनचं डिझाइन रेसिंग ट्रॅकपासून प्रेरित असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. फोनची निळी-पांढरी ड्युअल-टोन डिझाइन वेग, ताकद आणि अचूकता दर्शवते, असा कंपनीचा दावा आहे. फोनच्या पाठीमागील डिझाइन iQOO Neo10 च्या नारंगी रंगाच्या प्रकारासारखेच आहे, ज्यामध्ये डाव्या बाजूला "NEO POWER TO WIN" ब्रँडिंग आहे.
Get ready for the ultimate revolution in performance and design with the #iQOONeo10R! ⚡
— iQOO India (@IqooInd) February 4, 2025
Launching on 11th March—mark your calendars! 🗓️
Available exclusively on on @amazonIN and https://t.co/bXttwlZo3N#AmazonSpecials #PowerToPlay #iQOONeo10R pic.twitter.com/7B0T2MVkUx
किती असेल किंमत (अपेक्षित)
iQOO नं आधीच पुष्टी केली आहे की फोन स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 SoC द्वारे समर्थित असेल. हा फोन १.७ दशलक्ष+ AnTuTu स्कोअरवर आधारित ३०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन असेल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीनं म्हटलं आहे की की फोन ९०fps गेमिंग अनुभव देणार असून अल्ट्रा गेम मोडमध्ये आता इन-बिल्ट fps मीटर देखील यात मिळेल.
काय असतील फीचर
यामध्ये अजूनही ड्युअल रिअर कॅमेरे आणि मुख्य कॅमेऱ्यासाठी OIS चा वापर करण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा ५०MP Sony LYT-६०० सेन्सर आणि ८MP अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्यासह येईल, असा अंदाज आहे. यात ६४००mAh बॅटरीचा देखील मिळण्याची शक्यता आहे, फोन ८GB आणि १२GB RAM प्रकारांमध्ये २५६GB स्टोरेजसह येणार असल्याची शक्यता आहे. फोनमध्ये १४४Hz रिफ्रेश रेटसह ६.७८-इंच १.५K AMOLED डिस्प्ले, ४५०० nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि ३८४०Hz PWM डिमिंग असण्याची अपेक्षा आहे. तो Funtouch OS १५ सह Android १५ चालवेल आणि IP64 सह येईल. iQOO Neo १०R लाँच झाल्यानंतर iQOO.com व्यतिरिक्त AAmazon वर खरेदी करता येईल.
हे वाचलंत का :