ETV Bharat / entertainment

उर्मिला मातोंडकरच्या 'या' चूकीमुळं करिअर झालं उद्ध्वस्त, जाणून घ्या विशेष माहिती... - URMILA MATONDKAR BIRTHDAY

उर्मिला मातोंडकर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही विशेष गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Urmila Matondkar
उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar Photo - GettyImages)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 4, 2025, 12:52 PM IST

मुंबई - 90च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज 4 फेब्रुवारी रोजी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. आज 'रंगीला गर्ल' चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं बॉलिवूडमध्ये 90च्या दशकात रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक आणि निर्माते तिच्याबरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक असायचे. उर्मिलानं बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 3 वर्षांची असताना तिनं 1977मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्मा' चित्रपटात काम केलं. तसेच मुख्य अभिनेत्री म्हणून तिनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट 'चाणक्यन' मधून केली.

उर्मिला मातोंडकरचा चित्रपटसृष्टीतील प्रवास : 1974मध्ये मुंबईत जन्मलेली मातोंडकरचा पहिला हिंदी चित्रपट 'नरसिम्हा' होता, हा चित्रपट 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सनी देओल मुख्य भूमिकेत दिसला होता. दरम्यान 1995 मध्ये रिलीज झालेला राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता आमिर खान दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामधील गाणी देखील हिट झाली होती. उर्मिलाला 'रंगीला' चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उर्मिलानं तिच्या चित्रपट कारकिर्दीत राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर 13 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान असं म्हटलं जातं होतं की, राम गोपाल विवाहित असूनही उर्मिला त्यांच्यावर प्रेम करत होती. या दोघांच्या अफेयरबद्दल चर्चा चित्रपटसृष्टीत होती. उर्मिलाला राम गोपाल वर्मा खूप आवडाचे, त्यामुळे तिनं बाकी दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास नकार दिला होता. तसेच राम गोपाल वर्मा तिला प्रत्येक चित्रपटांमध्ये कास्ट करत होते.

राम गोपाल वर्माबरोबर उर्मिला मातोंडकरचं नात ? : राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला या नात्याबद्दल कळलं, त्यानंतर तिनं शूटिंग सेटवर येऊन उर्मिलाला झापड मारली होती. याबद्दल पूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चा झाली होती. यानंतर 'रंगीला गर्ल'नं आपलं नातं संपवलं होतं. या गोष्टीचा तिच्या कारकिर्दीवरही मोठा परिणाम झाला होता. या घटनेनंतर राम गोपाल यांच्या पत्नीनं त्यांना घटस्फोट दिल्याचे म्हटले जाते. उर्मिलानं राम गोपाल यांच्याबरोबर चित्रपट करण्यास बंद केलं होतं. यानंतर तिनं बाकी इतर दिग्दर्शकांना संपर्क साधला होता. मात्र अनेक दिग्दर्शकांनी तिच्याबरोबर काम करण्यास नकार दिला. यानंतर तिचे करिअर हे उद्ध्वस्त झाले. तिनं अभिनय क्षेत्र सोडले.

उर्मिला मातोंडकरचं वैयक्तिक आयुष्य : दरम्यान उर्मिलानं एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांच्याशी झालेल्या भांडणाबद्दल नाकारलं आणि म्हटलं होतं की, तिनं राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करणं थांबवलं नाही. तिचे करिअर दिग्दर्शकामुळे नाही तर घराणेशाहीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. तिला नेहमीच 'आयटम गर्ल' म्हणून पाहिलं जात होतं. दरम्यान उर्मिला मातोंडकर वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिनं वयाच्या 42व्या वर्षी काश्मिरी मॉडेल मोहसीन अख्तर मीरशी 4 फेब्रुवारी 2016मध्ये लग्न केलं. या दोघांची भेट मनीष मल्होत्राच्या माध्यमातून झाली. उर्मिलानं स्वत:पेक्षा 10 वर्षांनी लहान मुलाबरोबर लग्न केलं. या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.