हैदराबाद : युरोपियन युनियनमध्ये आयफोनवर पोर्नोग्राफिक अॅप्लिकेशन आलं आहे. त्यामुळं याबाबत ॲपलनं चिंता व्यक्त केलीय. तसंच कंपनीनं ईयूच्या डिजिटल धोरणाला दोष दिलाय. २००८ मध्ये आयफोन निर्माता कंपनीनं आपल्या अॅप स्टोअरवर कडक नियंत्रण ठेवलं होतं. वापरकर्त्यांसाठी कोणतं अॅप्स स्टोअरवरमध्ये ठेवायचं याचं सर्व नियंत्रण ॲपल करत होतं. मात्र, ईयूनं डिजिटल मार्केट्स अॅक्ट (डीएमए) स्वीकारल्यानंतर, अॅपल कंपनीला असं नियंत्रण आता ठेवता येत नाहीय. ज्यामुळं कंपनीच्या डिव्हाइसवर पर्यायी अॅप स्टोअर्सना परवानगी मिळतेय.
ऑल्टस्टोअर अॅप
या अॅप स्टोअरपैकी एक म्हणजे ऑल्टस्टोअर अॅप आहे. या ॲपमुळं ईयूमधील आयफोन वापरकर्त्यांना हॉट टब नावाचे पॉर्न अॅप वितरित करण्यास सुरुवात केली आहे. हे अॅप्लिकेशन "प्रौढ कंटेंट ब्राउझ करण्याचा सुरक्षित मार्ग" आहे. पर्यायी अॅप स्टोअर प्रक्रियेचा भाग म्हणून, आयफोन आणि इतर उपकरणांसाठी ऑफर केलेल्या अॅपला कंपनी पडताळून पाहत आहे.
ॲपला विरोध
रॉयटर्सनं दिलेल्या बातमीवरुन अॅपल कंपनीनं या ॲपला विरोध केलाय. तसंच पोर्नोग्राफिक अॅपला दिलेल्या मान्यता त्यांनी नाकारली आहे. मात्र, कायदेशीर बाबीमुळं या ॲपला स्टोरअवर परवानगी असल्याचं त्यांनी म्हटलंय. "मार्केटप्लेस डेव्हलपरनं खोट विधान केलं आहे. आम्ही या अॅपला मान्यता देणार नाहीय. ते ॲप आम्ही आमच्या अॅप स्टोअरमध्ये कधीही ऑफर करणार नाही," असं अॅपलनं म्हटलंय. ॲपलनं त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे पॉर्न वितरित करण्याविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. २०१० मध्ये, तत्कालीन सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोनवर पॉर्न दूर ठेवणं ही ॲपलची नैतिक जबाबदारी असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी ॲपल कंपनी द्वारपाल म्हणून काम करेल, असं देखील ते म्हणाले होते.
हार्डकोर पॉर्न ॲप्समुळं सुरक्षा धोक्यात
युरोपियन युनियनमध्ये AltStore द्वारे आयफोनवर पॉर्न ॲप्लिकेशनच्या उपलब्धतेवर प्रतिक्रिया देताना, ॲपलनं एका निवेदनात म्हटलं आहे की युरोपियन युनियन वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी या प्रकारच्या हार्डकोर पॉर्न ॲप्समुळं निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेच्या धोक्यांबद्दल कंपनी खूप चिंतित आहे. "हे ॲप आणि त्यासारखे इतर ॲप ग्राहकांचा आमच्या स्थेवरील विश्वास कमी करताय".
हे वाचलंत का :