ETV Bharat / entertainment

कपिल शर्माची टीम तिप्पट हास्य घेऊन परतेल, 'द ग्रेट इंडिया कपिल शो' सीझन 3ची झाली घोषणा... - THE GREAT INDIA KAPIL SHOW 3

कपिल शर्माची टीम नेटफ्लिक्सवर तिसऱ्या सीझनसह पुन्हा परतणार आहे. याबद्दल खुद्द कपिलनं घोषणा केली आहे.

Kapil Sharma
कपिल शर्मा (द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3 (घोषणा पोस्टर))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 4, 2025, 2:54 PM IST

मुंबई : कपिल शर्मानं त्याच्या बहुप्रतीक्षित 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सनं 2025च्या आगामी शोच्या सीझनबद्दल घोषणा करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. नेटफ्लिक्स इंडियानं एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा सुनील ग्रोव्हर धमाल करताना दिसत आहेत. कपिल शर्मानं दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात पुष्टी केल्यानंतर आता त्याचे चाहते खुश आहेत.

कपिल शर्मानं केली घोषणा : नेटफ्लिक्सनं पुष्टी केली आहे की, कपिलची टीम तिप्पट मजा घेऊन परत येईल. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मनीष पॉल विचारतो, "तर, सीझन 3 येत आहे, तुम्ही काय नवीन घेऊन येत आहात?' यावर कपिल गंमतीनं म्हटलं, "यार, सीझन 3 त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी तो फक्त एक एपिसोड आहे, आम्हाला एका वेळी 200 एपिसोड करण्याची सवय आहे." यानंतर कपिल सुनीलकडे बोट दाखवत म्हणतो, "आमच्यात भांडण होईपर्यंत शो संपत नाही." कपिलच्या या विधानावर सुनील ग्रोव्हर आणि संपूर्ण टीम खूप हसते.

कोल्डप्लेवरही केला कपिलनं विनोद : पुढं कपिलनं म्हटलं, "आम्हाला हा शो वर्षभर चालावा असे वाटते. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, लोक कोल्डप्लेसाठी इतके तिकिटे खरेदी करत होते आणि आम्हाला त्यांच्याकडून ईमेल येत होते की, ते शोमध्ये परत येऊ इच्छितात. यावर आम्ही करू शकत नाही. म्हणून नेटफ्लिक्सला माझी विनंती आहे की शो सतत चालवत राहिला पाहिजे."

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये झाली होती भांडण : कपिल शर्माबरोबर आणि सुनीलचं भांडण झाल्यानंतर त्यानं शो सोडला होता. मात्र सुनीलचं गुत्थी आणि डॉ. मशूर गुलाटी हे पात्र लोकांना खूप आवडलं होतं. यानंतर कपिल आणि सुनीलमध्ये समेट झाली. आता ते पुन्हा शोमध्ये एकत्र काम करत आहेत. या शोचे दोन्ही सीझन नेटफ्लिक्सवर ब्लॉकबस्टर हिट ठरले. आता कपिल शर्माची संपूर्ण टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज आहे. चाहते तिसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. कपिल शर्माच्या टीममध्ये सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, चंदन प्रभाकर, भारती सिंग, राजीव ठाकूर असे विनोदी कलाकार आहेत. तर अर्चना पूरण सिंह जजच्या खुर्चीवर बसणार आहेत.

हेही वाचा :

  1. एकेकाळी 500 रुपयांवर जगणारा 'हा' विनोदी कलाकार आज 300 कोटीचा मालक...
  2. कपिल शर्मासह 'या' स्टार्सला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आलेला ईमेल चर्चेत
  3. ॲटलीवर वर्णद्वेषी विनोद केल्याचा आरोप झाल्यानंतर कपिल शर्मानं दिलं यूजर्सला उत्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.